• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदर्श सरपंच अशोक मुळे यांचा मुंबईकर मंडळाच्या वतीने नागरी सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

पारनेर | प्रतिनिधी

देवीभोयरे गावचे विद्यमान सरपंच अशोकराव मुळे यांना गावात राबविण्यात आलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांबद्दल “आदर्श सरपंच” पुरस्काराने गौरविण्यात आले. अहिल्यानगर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच एम. पी. बिर्ला समूहाकडूनही त्यांना “आदर्श सरपंच” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

या पुरस्कारामुळे तालुक्यासह जिल्हाभरातून अशोकराव मुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून देवीभोयरे गावाची मान उंचावली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईकर मंडळाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला.

यावेळी आदर्श सरपंच अशोकराव मुळे यांचा सत्कार उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्त्व अंबु भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सरपंच विठ्ठल शेठ सरडे यांचा सत्कार मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ बेलोटे यांच्या हस्ते करण्यात आला.

मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ बेलोटे यांनी आपल्या मनोगतात देवीभोयरे गावाच्या विकासकामांचे कौतुक केले. गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळा, ऐतिहासिक अंबिकामाता प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प, गजराज शिल्प, सुसज्ज स्मशानभूमी तसेच गावांतर्गत रस्ते ही कामे गावाची वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास सुभाषराव बेलोटे, सरपंच जयवंत मुळे, उद्योजक अजित शेठ चंगेडिया, किशोर शेठ डागा, अंबु शेठ भंडारी, बाळासाहेब बेलोटे, रमेश महाराज खोडदे, सावकार शेठ नरोडे, भास्कर भाऊ बेलोटे, नामदेव चौधरी, शंकरराव चौधरी, संतोष कालघुगे, पत्रकार विनोद साळवे, उपसरपंच दत्तात्रय मुळे यांच्यासह मुंबईकर मंडळातील सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा संस्थेचे संचालक मंगेश मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळासाहेब बेलोटे यांनी मानले.

सत्काराला उत्तर देताना अशोकराव मुळे यांनी देवीभोयरे गावाच्या जडणघडणीत मुंबईकर मंडळाचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत गावाच्या विकासासाठी मंडळाचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार काढले.

Previous Post

महाराणा प्रताप सिंह जयंती उत्साहात साजरी

Next Post

कष्टी येथील परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी; ४९ विद्यार्थिनींची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
8
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
17
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
8
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
9
Next Post

कष्टी येथील परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी; ४९ विद्यार्थिनींची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In