• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कष्टी येथील परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी; ४९ विद्यार्थिनींची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मा. श्री. बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या परिक्रमा शैक्षणिक संकुलातील परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाने आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींची पुण्यातील नामांकित औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये निवड झाली असून, ही संस्था व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.

महाविद्यालयातील २७ विद्यार्थिनींची एजिओ फार्मा, भोसरी (पुणे) येथे तर २२ विद्यार्थिनींची एमक्योर फार्मास्युटिकल्स, पुणे येथे मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाने शिक्षणाचा उच्च दर्जा, सुसज्ज वसतिगृह, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांना दिले जाणारे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत.

विद्यार्थिनींनी सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. संस्थेच्या दर्जेदार शिक्षणपद्धतीमुळे आणि व्यावसायिक प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना थेट नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते हे विद्यार्थ्यांना अधिकाधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. उत्कृष्ट लॅब, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज मैदान आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ होत आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. सोनल सोलंकी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थिनींच्या या यशामुळे पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

आदर्श सरपंच अशोक मुळे यांचा मुंबईकर मंडळाच्या वतीने नागरी सत्कार

Next Post

नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचे जंगी स्वागत; पक्षनिष्ठेच्या निर्णयाचे शिवसैनिकांकडून स्वागत

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
8
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
17
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
8
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
9
Next Post

नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचे जंगी स्वागत; पक्षनिष्ठेच्या निर्णयाचे शिवसैनिकांकडून स्वागत

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In