• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोळगाव फाटा येथे सर्वपक्षीय नेत्यांचा धडक रास्ता रोको

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व रात्रीचे भारनियमन रद्द करण्याची मागणी

श्रीगोंदा | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाटा येथे आज सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी” तसेच “महावितरण कंपनीने रात्री ६ ते ९ या वेळेत सुरू केलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ रद्द करावे” या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलकांनी रस्ता रोखून धरला.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

या आंदोलनामुळे कोळगाव फाटा परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी निवेदन स्वीकारत मागण्या वरिष्ठ पातळीवर तातडीने पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असताना रात्री ६ ते ९ या महत्त्वाच्या वेळेत अतिरिक्त लोडशेडिंग करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यामुळे साप, विंचू आणि इतर वन्य प्राण्यांचा धोका वाढत असून शेतकऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

“दिवसा हक्काची वीज मिळाली पाहिजे आणि अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद केले पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली.

तसेच, अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना शासन केवळ घोषणाबाजी करत असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला.

या आंदोलनात तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. निवेदनावर राजेंद्र म्हस्के, हेमंत नलगे, अनिल घनवट, हरिदास शिर्के, राजेंद्र नागवडे, शामराव नागवडे, श्रीनिवास नाईक, भाऊसाहेब नेटके आदींच्या सह्या आहेत.

“मागण्या मान्य न झाल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलक नेत्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Previous Post

रायगड जिल्ह्यात अतिउष्णतेमुळे शाळांची वेळ बदलली; १९ ते ३० जूनदरम्यान सकाळच्या सत्रात वर्ग

Next Post

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते नवनियुक्त प्राचार्य नैना वाळके यांचा सत्कार

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
3
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते नवनियुक्त प्राचार्य नैना वाळके यांचा सत्कार

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In