• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

खरीप हंगामातील १२३ कोटींचे विमा वाटप पूर्ण; उर्वरित रक्कम वितरण प्रक्रिया सुरू

परभणी | प्रतिनिधी :

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील तब्बल ५ लाख ७३ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या अंतर्गत ३ लाख ८४ हजार ७२५.१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात सोयाबीन पिकासाठी पीक कापणी प्रयोगांच्या आधारे एकूण १२४ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली होती. यापैकी १९ जून २०२६ पर्यंत १२३ कोटी रुपयांचे वितरण पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

तसेच तूर पिकासाठी २२.१३ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून या निधीच्या वितरणाची कार्यवाहीही सध्या सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सोयाबीन पिकाच्या उर्वरित विमा दाव्याबाबत जिल्हा प्रशासनाने आयुक्त कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. पीक कापणी प्रयोगांबाबत विमा कंपनीने घेतलेल्या आक्षेपांवर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील करण्यात आले असून त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान, कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगांबाबत आयुक्त कृषी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. आवश्यक मंजुरी आणि मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रयोगांना पीएमएफबीवाय पोर्टलवर मान्यता देण्यात येणार असून त्यानंतर विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना विमा रकमेचे वाटप केले जाणार आहे.

याशिवाय रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ३२० शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून, १ लाख ४१ हजार ५०१.४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. या हंगामातील विमा रकमेच्या वितरणाची प्रक्रिया सध्या विमा कंपनी स्तरावर प्रलंबित आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची भूमिका बजावत असून जिल्ह्यातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

Previous Post

गौरी शुगर अँड डिस्टिलरीजमध्ये मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ ची उत्साहात सुरुवात

Next Post

बनावट पावत्या फाडून शासनाची फसवणूक?; आडगावच्या ग्रामसेवकाविरोधात संताप

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

बनावट पावत्या फाडून शासनाची फसवणूक?; आडगावच्या ग्रामसेवकाविरोधात संताप

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In