• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

योगा आणि प्राणायामाच्या माध्यमातूनच विद्यार्थी तणावमुक्त होऊ शकतात : उपप्राचार्या कल्पना पटेल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन योगाचे आद्य प्रणेते महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून उपप्राचार्या कल्पना पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश, प्रा. व्ही. सी. डोळे, प्रा. ए. पी. पाटील, क्रीडा शिक्षक प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ. डी. डी. पटेल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

यावेळी मार्गदर्शन करताना उपप्राचार्या कल्पना पटेल म्हणाल्या की, “आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती तणावाखाली वावरत आहे. मात्र नियमित योगासन आणि प्राणायाम केल्यास मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यास मोठी मदत होते.”

प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी विद्यार्थ्यांना उभे, बैठे, पाठीवर झोपून, पोटावर झोपून तसेच हातांच्या साहाय्याने केली जाणारी विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखवली. त्यांनी योगासनांचे आरोग्यदायी फायदेही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

तसेच प्रा. डॉ. डी. डी. पटेल यांनी प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करत त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

योगासन आणि प्राणायामाचा सराव करताना विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव मिळाला.

सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष बापुसो. दीपक पाटील, उपाध्यक्ष श्री. जगदीशभाई पाटील, समन्वयक प्रा. मकरंदभाई पाटील, संचालक श्री. मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल तसेच क्रीडा संचालक प्रा. डॉ. अरविंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश पटेल यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. शिवनाथ पटेल, प्रा. उदय पटेल, प्रा. मनोज चौधरी, प्रा. कल्पना निकुंभ, प्रा. चंद्रकांत पाटील, गोपाल सोनार, संजय विसावे, दिलवर ठाकरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

बोरी येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी आंदोलन तीव्र; नागरिकांचा जाहीर निषेध

Next Post

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
9
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
32
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
19
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In