• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर; जळगाव जलसुरक्षित करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांचे निर्देश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

जळगाव प्रतिनिधी :
जळगाव शहराला भविष्यातील पाणीटंचाईपासून सुरक्षित ठेवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी संधारण) धोरणाची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन, भूजल पातळीत वाढ आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर त्यांनी भर दिला.

सध्या जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सुमारे ६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा साठा अंदाजे सात महिन्यांसाठी पुरेल, अशी माहिती देण्यात आली. शहरातील पूरक जलस्रोत म्हणून ४३ विहिरी आणि ६० बोअरवेल कार्यरत आहेत. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आतापासूनच दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे उपमहापौरांनी स्पष्ट केले.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

त्यांनी शहरातील सर्व मोठे बांधकाम प्रकल्प, व्यापारी संकुले, गृहसंकुले, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था अनिवार्यपणे कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नाल्यांद्वारे वाहून जात असल्याने ते जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरातील एकूण पाणी वापरामध्ये किमान २० टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी जलवाहिन्यांमधील गळती रोखणे, अनधिकृत पाणी वापरावर कारवाई, पाण्याचा पुनर्वापर आणि जनजागृतीवर विशेष भर दिला जाणार आहे.

याशिवाय पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या नवीन कार वॉश व्यवसायांना परवानगी देताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा व्यावसायिकांनी पुनर्वापरित किंवा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा, असेही प्रशासनाला निर्देशित करण्यात आले आहे.

शहरातील जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून गळतीग्रस्त भागांची तातडीने दुरुस्ती, अनधिकृत पाणी जोडण्या, बायपास लाईन, मीटरमध्ये छेडछाड तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

घरगुती व व्यावसायिक स्तरावर आरओ (RO) यंत्रातून बाहेर पडणाऱ्या वेस्ट वॉटरचा साफसफाई, फ्लशिंग, बागकाम आदी दुय्यम कामांसाठी पुनर्वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, “माझे पाणी – माझा अभिमान” या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

यावेळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी म्हणाले, “वाघूर धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आजपासूनच प्रत्येक जळगावकराने पाणी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर आणि पाण्याचा अपव्यय रोखणे ही काळाची गरज असून प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून जळगाव शहर जलसुरक्षित बनवूया.”

Previous Post

मोहोडी–गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल

Next Post

माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा वीज वितरण कंपनीवर धडक मोर्चा

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा वीज वितरण कंपनीवर धडक मोर्चा

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In