• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के.इ.एस. लिटिल अँजेल्स स्कूल पेण येथे ‘विनंती थांबा’ मिळण्यासाठी निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी दिले सकारात्मक आश्वासन

पेण प्रतिनिधी : पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हाच्या वतीने के.इ.एस. लिटिल अँजेल्स स्कूल, पेण येथे एसटी बसचा ‘विनंती थांबा’ मंजूर करण्यात यावा, यासाठी विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांना लेखी निवेदन देण्यात आले.

पत्रकार कैलासराजे घरत यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी पेण रामवाडी येथील विभाग नियंत्रक कार्यालयात ही भेट घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन शाळेजवळ एसटी बस थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

यावर विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित सर्व आगार व्यवस्थापकांना आवश्यक सूचना देण्यात येतील तसेच शाळेजवळ ‘विनंती थांबा’ फलक उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या या निर्णयाबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वर्तक, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान बाबू घरत, रुपेश देसले यांच्यासह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

के.इ.एस. लिटिल अँजेल्स स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत खारपाडा, जिते, खरोशी, कोपर, दुरशेत, बळवली, गोविर्ले, इरवाडी आणि तरणखोप परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी दररोज एसटी बसने प्रवास करतात. मात्र पनवेलकडून येणाऱ्या बस अंतोरा फाटा येथेच थांबत असल्याने विद्यार्थ्यांना पुढे पायी जावे लागते.

पावसाळ्यात दप्तर, रेनकोट आणि छत्री घेऊन सर्व्हिस रोडवरून चालताना विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे शाळेजवळ एसटी बस थांबा मिळाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होऊन सुरक्षित प्रवासाला मदत होणार असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

Previous Post

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

Next Post

कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर भीषण अपघात

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
13
Next Post

कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर भीषण अपघात

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In