• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कत्तलखान्यावर छापा; तब्बल २ हजार किलो गोमांस जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | संगमनेर

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली. अवैध कत्तल व गोमांस वाहतूक प्रकरणात पोलिसांनी छापा टाकून तब्बल २ हजार किलो गोमांसासह १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल डोके, योगेश कर्डीले, महादेव भांड तसेच महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्यांविरोधात माहिती संकलित करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

पथक संगमनेर शहरात गस्त घालत असताना रेहान उर्फ जादू गुलाबनबी कुरेशी (रा. संगमनेर) व त्याचा साथीदार काशीब असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) हे त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सुकेवाडी रोडवरील श्रमिकनगर परिसरात, जिजामाता इंग्लिश स्कूलजवळील मोकळ्या जागेत एका पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांचे कत्तल केलेले गोमांस विक्रीसाठी वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी छापा टाकला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळी उभ्या असलेल्या पिकअप वाहनाची चौकशी केली असता ते आरोपी रेहान उर्फ जादू गुलाबनबी कुरेशी (रा. अलकानगर, संगमनेर) आणि काशीब असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) यांचे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ६ लाख रुपये किमतीचे २ हजार किलो गोमांस तसेच ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.

Previous Post

बेग, ससाणे यांना अटक; पोलिसांची धरपकड सुरू

Next Post

कळंबोलीत विकासकामांची पोलखोल; निकृष्ट दर्जामुळे फुटपाथची पडझड

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
15
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

कळंबोलीत विकासकामांची पोलखोल; निकृष्ट दर्जामुळे फुटपाथची पडझड

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In