• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लंडन ते पंढरपूर ‘ग्लोबल वारी 2026’चे कळंबोली- कामोठेत जल्लोषात स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

फटाक्यांची आतषबाजी, विठ्ठल नामघोष आणि पादुकांच्या दर्शनाने परिसर भक्तिमय; जगभर विठ्ठल भक्तीचा संदेश देणाऱ्या ऐतिहासिक वारीचे उत्स्फूर्त स्वागत..

प्रतिनिधी :
युनायटेड किंगडम (यूके) येथील लंडनमधून प्रारंभ झालेली पहिली ‘लंडन ते पंढरपूर ग्लोबल वारी 2026’ अकरा देशांचा प्रवास पूर्ण करून भारतात दाखल झाली असून, पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होत असताना कळंबोली- कामोठे येथे या ऐतिहासिक वारीचे २ जुलै रोजी उत्साहपूर्ण, भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

कामोठे पुलाजवळ आयोजित स्वागत सोहळ्यात विठ्ठल नामघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत वारकरी व नागरिकांनी वारीचे जल्लोषात स्वागत केले. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात भाविकांनी पवित्र विठ्ठल पादुकांची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

ही वैश्विक वारी यूके, नेदरलँड्स, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली, तुर्की, दुबई, ओमान, सिंगापूर आदी देशांचा प्रवास करत भारतात दाखल झाली आहे. जगभर वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि श्री विठ्ठल भक्तीचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आयोजक डॉ. अनिल खेडकर यांनी दिली.

या स्वागत सोहळ्यास कळंबोली व कामोठे परिसरातील राजकीय , सामाजिक , वारकरी, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या अनोख्या आणि ऐतिहासिक उपक्रमामुळे परिसरात भक्ती, संस्कृती आणि जागतिक एकात्मतेचा सुंदर संदेश पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: Shrinath Laad
Previous Post

कळंबोलीत विकासकामांची पोलखोल; निकृष्ट दर्जामुळे फुटपाथची पडझड

Next Post

झारगडवाडी अपात्रता प्रकरणाला पूर्णविराम

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
8
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

झारगडवाडी अपात्रता प्रकरणाला पूर्णविराम

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In