• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यवतमाळमध्ये HTBT बोगस कपाशी बियाणे रॅकेट उघड; कंपन्या आणि कृषी केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

यवतमाळ | प्रतिनिधी

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे प्रतिबंधित केलेल्या HTBT (Herbicide Tolerant Bt Cotton) कपाशीच्या बोगस बियाण्यांची अधिकृत ब्रँडच्या नावाखाली विक्री करून शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या कंपन्या व कृषी केंद्र चालकाविरोधात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

दिनांक २० मे २०२६ रोजी बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. धिरज प्रकाश मोहेकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सुरत (गुजरात) येथून यवतमाळमध्ये प्रतिबंधित कपाशी बियाण्यांची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे कृषी विभाग, यवतमाळ शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कारवाई करत ‘शिहोरी ट्रॅव्हल्स’ बसमधून मोठ्या प्रमाणात बियाण्यांचा साठा जप्त केला.

या कारवाईत ‘पाटीदार सिड्स प्रायव्हेट लिमिटेड, अहमदाबाद’ उत्पादित आणि ‘रुबिकॉन सिड्स, अहमदाबाद’ विपणन केलेले ‘Ridhi 7575’ (NAMCOT-621 BG II) तसेच ‘Ridhi 640’ या ब्रँडची एकूण ७० कपाशी बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

तपासादरम्यान संबंधित शेतकऱ्यांनी ही बियाणे सुरत येथील ‘सरदार ॲग्रो ॲन्ड बिज निगम’ या कृषी केंद्रातून खरेदी केल्याचे समोर आले. त्यामुळे शेतकरी या फसवणुकीचे बळी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

जप्त केलेल्या बियाण्यांचे नमुने अधिकृत बीज परीक्षण प्रयोगशाळा, नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात या बियाण्यांमध्ये “EPSPS-CP4” हा जनुकीय घटक अनुक्रमे ९१ टक्के आणि ९३ टक्के प्रमाणात पॉझिटिव्ह आढळून आला. हा घटक प्रतिबंधित HTBT कपाशी बियाण्यांमध्ये आढळत असल्याने हे बियाणे शासनाने बंदी घातलेल्या प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी खालील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

१) पाटीदार सिड्स प्रायव्हेट लिमिटेड, अहमदाबाद (उत्पादक कंपनी)
२) रुबिकॉन सिड्स, अहमदाबाद (विपणनकर्ता कंपनी)
३) सरदार ॲग्रो ॲन्ड बिज निगम, सुरत (कृषी केंद्र चालक)

बियाणे निरीक्षक श्री. धिरज प्रकाश मोहेकर यांच्या फिर्यादीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात प्रथम खबर क्रमांक ०५६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), बीज अधिनियम, बियाणे नियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवदर्शन सूर्यकांत बिरादार करीत असून, कृषी विभाग आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना अधिकृत व प्रमाणित बियाण्यांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

लवकरच अंबाजोगाई येथे राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन – पत्रकार सतीश मोरे यांची माहिती

Next Post

रत्नागिरीत मुसळधार पावसाचा कहर; कासई शिंदेवाडीत मोठे भूस्खलन, खेड-खोपी-धामणंद मार्गावरील वाहतूक ठप्प

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
20
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
32
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
30
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
41
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
7
Next Post

रत्नागिरीत मुसळधार पावसाचा कहर; कासई शिंदेवाडीत मोठे भूस्खलन, खेड-खोपी-धामणंद मार्गावरील वाहतूक ठप्प

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In