• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबाजोगाईला बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी; ‘स्वाराती’च्या जीएनएम विद्यालयाचे १०० जागांच्या महाविद्यालयात श्रेणीवर्धन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

अंबाजोगाई | प्रतिनिधी

अंबाजोगाईसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (स्वाराती) संलग्न जीएनएम पदविका परिचर्या विद्यालयाचे श्रेणीवर्धन करून १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे शासकीय बीएस्सी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला.

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई व बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर नर्सिंगचे उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

देशात प्रशिक्षित नर्सेसची वाढती गरज लक्षात घेऊन २१ जून २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती. ‘अपग्रेडेशन ऑफ स्कूल्स ऑफ नर्सिंग टू कॉलेज ऑफ नर्सिंग’ या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी ७ कोटी रुपयांचा १०० टक्के केंद्रीय निधी उपलब्ध होणार असून, उर्वरित खर्च राज्य शासन उचलणार आहे. महाविद्यालयासाठी आवश्यक इमारत उपलब्ध असल्याने शैक्षणिक प्रक्रिया लवकर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निर्णयामुळे बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई परिसरातील विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रातील पदवी शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जावे लागणार नाही. तसेच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.

या निर्णयाबद्दल आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, या महत्त्वपूर्ण निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

मुसळधार पावसाचा फटका; शिवनेरी किल्ल्याचा पदपथ मार्ग बंद, पर्यटकांना प्रवेशबंदी

Next Post

गंगापूर–लासूर रस्त्याचे काम रखडले; विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिकांना मनस्ताप

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
0
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
13
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
9
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
10
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
15
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
26
Next Post

गंगापूर–लासूर रस्त्याचे काम रखडले; विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिकांना मनस्ताप

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In