लोहा : प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील बेरळी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात गावचे सरपंच व्यंकटेश सुरनर यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपसरपंच रमेश डोंगरे, महिला गटाच्या अध्यक्षा आम्रपाली सोनवणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, रोजगार सेवक संभाजी ढेंबरे, अंगणवाडी सेविका आशा वरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कपिल रायबोले, उत्तम गायकवाड, संदीप रायबोले, भागवत ढेंबरे आदी उपस्थित होते.
गावाच्या विकासाला आगामी काळात अधिक गती देण्यात येणार असून विविध विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन सरपंच व्यंकटेश सुरनर यांनी यावेळी दिले. तसेच त्यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे माधव कांबळे यांनी आभार मानले.







