• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उद्योजक सदस्य बैठक संपन्न.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उद्योजक सदस्य बैठक संपन्न.
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक, १४ ऑगस्ट २०२६ : युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडिया (YEFi) यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील उद्योजिकांसाठी जिल्हा उद्योजक सदस्य बैठक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सी.वाय.डी.ए. कौशल्य विकास केंद्र, नाशिक येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीस नाशिक जिल्ह्यातील सुमारे ४० उद्योजिका उपस्थित होत्या.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)चे श्री. स्वप्निल शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या संचालक सौ. ज्योत्स्ना बहिरट यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्योजकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, व्यवसायवृद्धीच्या संधी निर्माण करणे, ब्रँडिंग, बाजारपेठेशी जोडणी, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर तसेच उद्योजकांमधील परस्पर संपर्क व सहकार्य वाढविणे हा बैठकीचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमादरम्यान पूनम सहाणे यांची युथएड एंटरप्रेन्युअर्स फेडरेशन ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. तसेच YEFiच्या सदस्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

नवकल्पना, ब्रँडिंग आणि बाजारपेठेतील संधींवर पॅनेल चर्चा

कार्यक्रमात “नवकल्पना, ब्रँडिंग आणि बाजारपेठेतील संधींच्या माध्यमातून सूक्ष्म व लघु उद्योगांचा विस्तार” या विषयावर विशेष पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली.

या चर्चेचे सूत्रसंचालन श्री. योगेश पाटील, व्यवस्थापकीय संचालक, वॉश मित्र यांनी केले.

पॅनेल चर्चेत श्री. नितीन कापुरे, गट अभियान व्यवस्थापक, निफाड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद); सौ. सुनंदा मधुकर निंबाळकर, यशोदिनी ऑर्गॅनिक्स; तसेच श्री. रवींद्र पवार, सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांनी सहभाग घेतला.

चर्चेदरम्यान व्यवसायवृद्धी, प्रभावी ब्रँडिंग, बाजारपेठेशी जोडणी, ग्राहकांचा विश्वास निर्माण करणे, संस्थात्मक सहकार्य, डिजिटल माध्यमांचा वापर आणि व्यवसायाचा विस्तार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजिकांनीही आपल्या व्यवसायातील अनुभव, अडचणी आणि भविष्यातील संधी याबाबत संवाद साधला.

या बैठकीच्या माध्यमातून उद्योजिकांना परस्पर परिचय, अनुभवांची देवाणघेवाण, नेटवर्किंग तसेच भविष्यातील व्यवसायविषयक सहकार्य आणि संधींबाबत चर्चा करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले.

कार्यक्रमास श्री. अविनाश सोनवणे, श्री. सौरभ गिरीगोसावी, श्री. हर्ष फपाळ, श्री. श्यामकांत सोनावणे, दिपाली पवार, दिपाली भारस्कर व उर्वशी बोरसे यांची उपस्थिती होती.

Previous Post

जेष्ठ कृषीतज्ञ काकासाहेब शिंदे पाटील यांचे निधनाने नेवासा तालुक्यावर शोककळा; सुरेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Next Post

‘वंदे मातरम्’च्या इतिहासातून स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा; राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या प्रवासाला उजाळा

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
41
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
14
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
12
Next Post
‘वंदे मातरम्’च्या इतिहासातून स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा; राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या प्रवासाला उजाळा

‘वंदे मातरम्’च्या इतिहासातून स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा; राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या प्रवासाला उजाळा

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In