• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पन्हाळा-शाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
पन्हाळा-शाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

बांबवडे प्रतिनिधी : पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार, गोकुळ दूध संघाच्या माजी संचालिका संजीवनीदेवी संजयसिंह गायकवाड यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पन्हाळा-शाहूवाडी परिसरासह कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

संजीवनीदेवी गायकवाड या गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंह गायकवाड यांच्या मातोश्री, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड यांच्या मातोश्री होत. त्यांचे मूळ गाव सुपात्रे, ता. शाहूवाडी हे आहे.

सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या संजीवनीदेवी गायकवाड यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, सहकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. कार्यकर्ते, समर्थक, नातेवाईक आणि हितचिंतकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार

संजीवनीदेवी गायकवाड यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी 11.30 वाजता
जगजीवन हाईट्स, फ्लॅट नं. बी-६, विशाळगड हाऊस कंपाऊंड, बावडा रोड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथून निघणार आहे.

तसेच सकाळी 12.00 वाजता पंचगंगा नदी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संजीवनीदेवी गायकवाड यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबीयांसह त्यांच्या असंख्य चाहत्यांवर आणि समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती 🙏

Previous Post

परिते ग्रामसभेत धक्कादायक उत्तर; ४० वर्षांचा कारभार नेमका कुणाच्या भरवशावर?

Next Post

शहादा येथे पूज्य सानेगुरुजी महाविद्यालयात “उन्मेष” भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न.

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
39
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
11
Next Post
शहादा येथे पूज्य सानेगुरुजी महाविद्यालयात “उन्मेष” भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न.

शहादा येथे पूज्य सानेगुरुजी महाविद्यालयात "उन्मेष" भित्तीपत्रकाचे उद्घाटन संपन्न.

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In