आढेगाव : टेंभुर्णी ते अकलूज अशी नवीन एसटी बससेवा आढेगाव, वडोली, चांदज, टाकळी (टे), गार अकोले, बावडा मार्गे अकलूज अशी सुरू करण्यात आली आहे.
या नवीन बससेवेचे कोंढार भागातील गावात ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण वर्ग तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन बससेवेमुळे चांदज व परिसरातील नागरिकांना अकलूजसह मार्गावरील गावांमध्ये ये-जा करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांची वाहतुकीची सोय होणार असल्याने ग्रामस्थांनी या बससेवेचे स्वागत केले.
नवीन एसटी बससेवेमुळे चांदज परिसरातील दळणवळणाला मिळणार नवी गती!







