• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तहसीलदार वाई व पशुधन विकास अधिकाऱ्यांची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करा; कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा शिवशक्ती भीमशक्तीचा इशारा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
तहसीलदार वाई व पशुधन विकास अधिकाऱ्यांची चौकशी करून सेवेतून बडतर्फ करा; कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा शिवशक्ती भीमशक्तीचा इशारा
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी नित्यानंद मोरे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

पुणे : वाईच्या तहसीलदार तसेच त्यांच्या पती असलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या कथित गैरकारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि दोषी आढळल्यास सेवेतून बडतर्फ करावे, या मागणीसाठी शिवशक्ती भीमशक्तीच्या वतीने विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

वाई तहसीलदार यांच्या कार्यशैलीबाबत तसेच त्यांच्या पती, पशुधन विकास अधिकारी यांच्या कथित गैरप्रकारांबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. धोम पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बंगला उभारल्याचा आरोप, गौण खनिज उत्खननातील कथित भ्रष्टाचार तसेच पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या विविध मुद्द्यांवर राष्ट्रीय मराठा महासंघ आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शिवशक्ती भीमशक्तीचे संयुक्त लक्षवेधी उपोषण दिनांक 12, 13 आणि 14 ऑगस्ट रोजी वाई तालुक्यात करण्यात आले होते. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी, वाई यांनी तहसीलदार वाई यांचा कार्यभार बदला व इतर बाबींवर जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केल्याचे आंदोलकांनी सांगितले.

मात्र, संबंधित प्रकरणात अद्याप अपेक्षित ती कठोर कारवाई झालेली नसल्याने आता विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करताना राष्ट्रीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे आणि वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते उपस्थित होते.

संबंधित आरोपांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कारवाईला विलंब झाल्यास महसूलमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही शिवशक्ती भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Ad 1
Previous Post

श्रावण सोमवारनिमित्त महिलांसाठी महादेव दर्शनाचा उपक्रम

Next Post

साखर महागली, ठाकरे गट पेटला! जळगावात ‘बिनसाखरेचा चहा’ करून सरकारला दणका

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
साखर महागली, ठाकरे गट पेटला! जळगावात ‘बिनसाखरेचा चहा’ करून सरकारला दणका

साखर महागली, ठाकरे गट पेटला! जळगावात ‘बिनसाखरेचा चहा’ करून सरकारला दणका

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In