• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाचा स्नेहमेळावा उत्साहात

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
0
SHARES
149
VIEWS
Ad 1
Ad 1

ज्येष्ठ सेवानिवृत्तांचा सन्मान आणि पदाधिकारी-सदस्यांच्या एकजुटीने कार्यक्रमाला कौटुंबिक स्वरूप

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

पुणे, दि. २५ ऑगस्ट : पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाचा स्नेहमेळावा रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. हा मेळावा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता सेवानिवृत्त बंधू-भगिनींच्या स्नेह, आपुलकी आणि एकजुटीचा अविस्मरणीय सोहळा ठरला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अमोलजी नलावडे, सभापती, कृषी व संवर्धन समिती, जिल्हा परिषद पुणे उपस्थित होते. त्यांच्या आगमनावेळी महिला पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी औक्षण व पुष्पवृष्टी करून स्वागत केले. महिला भगिनींना गजरे वाटप करण्यात आल्याने कार्यक्रमस्थळी आनंदी व प्रसन्न वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जीवन गायकवाड व श्री. वि. ल. पवार यांनी नेटके, ओघवते आणि प्रसंगानुरूप पद्धतीने केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार तसेच व्यासपीठावरील व्यवस्थेचे नियोजन श्री. बहिरट रावसाहेब, श्री. माने रावसाहेब व इतर पदाधिकाऱ्यांनी केले.

ज्येष्ठ सेवानिवृत्तांचा सन्मान

स्नेहमेळाव्यात ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी बंधू-भगिनींचा त्यांच्या कुटुंबीयांसह प्रमुख पाहुणे मा. नलावडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रमातील अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय क्षण ठरला. आयुष्यभर केलेल्या सेवेला कृतज्ञतेची मानवंदना देण्याच्या भावनेतून करण्यात आलेल्या या सन्मानाचे उपस्थितांनी कौतुक केले.

तसेच अत्यंत ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी श्री. गालीन्दे साहेब, श्री. धाडवे साहेब, श्री. पडवळ साहेब, श्री. पोळ साहेब यांच्यासह अन्य ज्येष्ठ सभासदांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

सभासद वर्गणी जमा करणे व उपस्थितांची हजेरी घेण्याची जबाबदारी श्री. थिटे साहेब, श्री. केदारी रावसाहेब व श्री. वायकर रावसाहेब यांनी शिस्तबद्धपणे पार पाडली. श्री. उत्पातजी यांनी प्रत्येक उपस्थिताचे गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत विशेष कौतुकास्पद ठरले.

सत्कारमूर्तींच्या सत्कारासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था सौ. पाटील मॅडम व सौ. तोटे मॅडम यांनी केली. त्यांना श्री. बाळासाहेब तुळसे व श्री. घुले यांनी सहकार्य केले. महिला कार्यकारिणी सदस्यांनी सत्कारमूर्तींचे औक्षण व पुष्पवृष्टी करून कार्यक्रमाला कौटुंबिक व स्नेहपूर्ण वातावरण प्राप्त करून दिले.

सौ. सुबळकर मॅडम यांनी आवडीने तयार करून आणलेले खजुराचे मोदक व पेढे उपस्थितांना प्रेमपूर्वक वाटप केले. या उपक्रमामुळे स्नेहमेळाव्यातील गोडवा आणखी वाढला.

नियोजनबद्ध आयोजनामुळे कार्यक्रम यशस्वी

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक वस्तूंची वेळेत व योग्य पद्धतीने खरेदी करण्याची जबाबदारी श्री. वि. ल. पवार, श्री. जीवन गायकवाड, श्री. सुभाष झणझणे व सौ. सातभाई मॅडम यांनी पार पाडली.

तसेच श्री. गायकवाड आप्पा, श्री. झणझणे जी, श्री. रसाळजी, श्री. डोळेजी, श्री. देवजी, श्री. धात्रकजी, श्री. चौधरीजी, श्री. सूर्यवंशीजी यांच्यासह संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या तत्परतेने पार पाडल्या.

कार्यक्रमातील भोजनाची व्यवस्था अध्यक्ष पी. के. मर्ढेकर व श्री. अशोक य. गायकवाड यांनी केली. सुग्रास भोजनामुळे उपस्थितांच्या आनंदात आणखी भर पडली.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशामागे श्री. वि. ल. पवार, श्री. जीवन गायकवाड, श्री. सुभाष झणझणे तसेच संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे पूर्वनियोजन, नियोजनबद्ध कामकाज आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले.

कार्यक्रमाच्या यशाबद्दल संघाचे अध्यक्ष पी. के. मर्ढेकर यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच सहकार्य करणाऱ्या बंधू-भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले. संघाची एकजूट, आपुलकी आणि सहकार्याची भावना अशीच वृद्धिंगत होत राहावी तसेच संघाच्या कार्यासाठी वार्षिक वर्गणी, आजीवन सभासद फी व देणगीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

“प्रत्येक जण आपली जबाबदारी मनापासून पार पाडतो, तेव्हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरतो,” या भावनेतून पार पडलेला हा स्नेहमेळावा ‘आपण एक कुटुंब आहोत’ या भावनेचा प्रत्यय देणारा ठरला.

Ad 1
Previous Post

स्मार्ट मीटर विरोधात सुरगाव ग्रामस्थांचे आक्रोश निवेदन

Next Post

रायगडचे नवे पालकमंत्री भरतशेठ गोगावले ; पनवेलमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष!

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
रायगडचे नवे पालकमंत्री भरतशेठ गोगावले ; पनवेलमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष!

रायगडचे नवे पालकमंत्री भरतशेठ गोगावले ; पनवेलमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष!

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In