गोविंदा गीतावर ठेका धरत कॉलनीत रंगला जल्लोष
आगाशिवनगर दत्तशिवम कॉलनीतील यावर्षी लहान मुलांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांचा आत्मविश्वास व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सण, उत्सवाचा आनंद प्रत्येकाच्या वाटेला यावा आणि प्रत्येकाशी आपल्या संस्कृतीशी जोडले जाणार हे क्षण मनमुराद अनुभवता यावेत. या भावनेतून आगाशिवनगर येथील दत्तशिवम कॉलनीतील लहान मुलांनी यावर्षी 5 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीनिमित्ताने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते या उत्सवात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन गोविंदा गीतावर ठेका धरत दहीहंडीचा मनसोक्त आनंद घेतला या उत्सवात मुलांच्या सोबत कॉलनीतील अबाल वृद्ध ,महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी होते.










