• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा, खेडदिगर मंडळात सेवा संकल्प अभियान शिबिर उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 1, 2026
in Blog
0
शहादा, खेडदिगर मंडळात सेवा संकल्प अभियान शिबिर उत्साहात संपन्न
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

शासकीय योजनांचा पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ; प्रमाणपत्रांचे वितरण आणि विविध विभागांकडून मार्गदर्शन

शहादा, दि. ३० (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध योजना व शासकीय सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत खेडदिगर मंडळ भागात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

शहादा तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख तथा तहसीलदार संभाजी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले असून विविध प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.

तहसीलदार संभाजी पाटील यांनी ‘जिवंत सातबारा’ मोहिमेबाबत माहिती देताना या मोहिमेला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ झाल्याचे सांगितले. नागरिकांनी आपल्या जमिनीशी संबंधित नोंदी व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सरपंच गणेश बागुल यांनी नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवून पात्रतेनुसार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

पुरवठा विभागाच्या वतीने रेशनकार्डधारक व पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. या उपक्रमासाठी परिसरातील रेशन दुकानदार तथा स्वस्त धान्य दुकानदारांनी सहकार्य केले. लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी स्वस्त धान्य दुकानदारांचे कौतुक केले.

शिबिरास सरपंच गणेश बागुल, सरपंच नवनाथ वाघ, सामाजिक कार्यकर्त्या मंजुळाताई मुसळदे, सामाजिक कार्यकर्ते युवराजभाऊ, मंडळ अधिकारी ब्राह्मणपुरी, ग्रामसेवक अरुण गवळी तसेच ब्राह्मणपुरी मंडळातील ग्राम महसूल अधिकारी व कोतवाल उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व पुरवठा विभागाशी संबंधित विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.

पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. शिरीषचंद्र परदेशी व त्यांच्या टीमने केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. लक्ष्मण कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष माळी, श्री. राजू शिंदे व देवा भाऊ यांनी सहकार्य केले.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महसूल, पुरवठा तसेच इतर विभागांच्या विविध योजना व सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, अशा शिबिरांमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी माहिती, मार्गदर्शन आणि पात्रतेनुसार प्रत्यक्ष लाभ मिळण्यास मदत होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार-२०२६’ संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

शहादा नगरपरिषदेच्या सभेत १९ पैकी १६ विषय मंजूर; तीन विषयांवर चर्चेनंतर स्थगिती

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
0
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
4
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
2
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
9
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
1
Next Post
शहादा नगरपरिषदेच्या सभेत १९ पैकी १६ विषय मंजूर; तीन विषयांवर चर्चेनंतर स्थगिती

शहादा नगरपरिषदेच्या सभेत १९ पैकी १६ विषय मंजूर; तीन विषयांवर चर्चेनंतर स्थगिती

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In