• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 1, 2026
in Blog
0
खानदेशातील विविध रोजगार मेळाव्यात ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शहादा, धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यांतील रोजगार मेळाव्यांत प्रतिनिधींची उपस्थिती; तीन अभियंत्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

शहादा, दि. ३० (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाच्या वतीने खानदेशातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विविध रोजगार मेळाव्यांमध्ये ‘स्व. विपुल खेडकर सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन’च्या प्रतिनिधींनी सहभागी होत रोजगार शोधार्थींना मार्गदर्शन व सहकार्य केले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

शहादा येथील जी. टी. पी. कॉलेजच्या जिमखाना इमारतीत आयोजित रोजगार मेळाव्याच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी. जी. जाधव, जिल्हा रोजगार व उद्योजकता अधिकारी मंगेश वाघ, आयटीआयचे प्राचार्य वाय. एम. पाटील तसेच जी. टी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यास ‘स्व. विपुल खेडकर फाउंडेशन’च्या वतीने सचिव रामकृष्ण मोरे, संचालक गणेश ढोले, सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार आणि संदीप वाडीले उपस्थित होते. खानदेशातील इतर रोजगार मेळाव्यांमध्येही फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

जिजामाता नर्सिंग कॉलेज येथील मेळाव्यात भास्कर रामोळे, खापर येथील मेळाव्यात मंच पदाधिकारी लक्ष्मण वाडीले व गोरख भोई, नवापूर येथे अशोक वाडीले, तळोदा येथे जालिंधर भोई, धडगाव येथे ज्ञानेश्वर वानखेडे, तर शहादा येथे कृष्णा खेडकर यांनी प्रतिनिधित्व केले.

दरम्यान, स्व. विपुल खेडकर सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशनच्या कार्यालयात सायली इंडस्ट्रीचे एमडी शैलेश जाधव, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सचे एचआर स्वप्नील बरकते, लुमॅक्स कंपनीचे एचआर बागुल आणि बालाजी काकडे यांच्या हस्ते तीन अभियंत्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी मोरे समाजाचे ज्येष्ठ नेते सुप्रडू खेडकर, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. महेंद्र खेडकर आणि संचालक राजू तावडे उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यातील विविध रोजगार मेळाव्यांमध्ये धुळे येथे पत्रकार प्रतिनिधी भास्कर फुलपगारे, ओम फुलपगारे, विशाल फुलपगारे व पवन फुलपगारे, शिरपूर येथे भाईदास भोई व सी. एम. भाई, तर थाळनेर येथे भिकन वाडीले, मंगेश वाडीले, अमृत वाडीले व बारकू वाडीले यांनी सहभाग घेतला.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे किसन धनराळे व गोरखनाथ बाबा, अमळनेर येथे संतोष शिंगाणे तसेच नाशिक येथे राजेंद्र वाडीले यांनी रोजगार मेळाव्याच्या कामकाजात सहभाग नोंदविला. विविध ठिकाणी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सहभागामुळे रोजगार शोधणाऱ्या युवकांना विविध संधींची माहिती मिळण्यास मदत झाली.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा नगरपरिषदेच्या सभेत १९ पैकी १६ विषय मंजूर; तीन विषयांवर चर्चेनंतर स्थगिती

Next Post

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
0
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
4
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
2
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
9
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
1
Next Post

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In