• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोर्टलवर नोंदणी केलेल्या महिलांना काय मिळणार?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

महिला शेतकरी प्रमाणपत्रातून कृषी योजना, कर्ज, विमा व अनुदानाचा लाभ; २ ऑक्टोबरनंतर प्रमाणपत्र वितरण

दर्यापूर प्रतिनिधी :

RelatedPosts

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या क्रॉसकंट्री खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

दर्यापूर : महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राज्यात ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६’ अंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रमाणपत्रामुळे महिलांना अधिकृतपणे महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळणार असून, शासनाच्या विविध कृषी योजना, कर्ज, पीक विमा, अनुदान, प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.

या अभियानाला अमरावती जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ७९६ महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती देण्यात आली आहे. दर्यापूर तालुक्यात ७ हजार ७५०, तर धारणी तालुक्यात ८ हजार १५० महिलांनी प्रमाणपत्र मिळविल्याचे सांगण्यात आले आहे. अभियानाच्या अंमलबजावणीत दर्यापूर व धारणी तालुक्यांनी जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांसह दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, भाजीपाला व फळबाग लागवड तसेच इतर शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना या प्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे.

जमीन नावावर नसली तरी प्रमाणपत्र मिळणार

महिलेच्या नावावर शेतजमीन नसली तरी ती प्रत्यक्ष शेती व शेतीपूरक कामांमध्ये सहभागी असल्यास पात्रतेनुसार महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळू शकते. पीक लागवड, शेतमजुरी, पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, रेशीम उत्पादन व वनौपज संकलन यांसारख्या कामांमध्ये सहभागी महिलांचा यामध्ये समावेश होऊ शकतो.

या प्रमाणपत्राच्या माध्यमातून महिलांना शासकीय कृषी योजना, बँक कर्ज, पीक विमा, अनुदान तसेच शेतीशी संबंधित व्यवसाय वाढविण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.

२ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा

महिला शेतकरी पोर्टलवर अर्ज केलेल्या महिलांची पात्रता तपासणी २ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत करण्यात येणार असून, त्यानंतर पात्र महिलांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज डगे यांनी दिली.

महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळाल्याने कृषी क्षेत्रातील त्यांच्या सहभागाला संस्थात्मक आधार मिळण्यास मदत होणार असून, शेती व शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यास या उपक्रमाचा उपयोग होऊ शकतो.

Previous Post

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Next Post

नसरापूरच्या शंकरराव भेलके महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

Related Posts

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा
Blog

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

October 2, 2026
0
चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू
Blog

चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

October 2, 2026
0
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या क्रॉसकंट्री खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या क्रॉसकंट्री खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 2, 2026
0
उमरग्यात स्वच्छतेचा जागर; ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात नगरपरिषद पदाधिकारी मैदानात
Blog

उमरग्यात स्वच्छतेचा जागर; ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात नगरपरिषद पदाधिकारी मैदानात

October 2, 2026
4
नसरापूरच्या शंकरराव भेलके महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
Blog

नसरापूरच्या शंकरराव भेलके महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

October 2, 2026
14
कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित
Blog

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

October 2, 2026
1
Next Post
नसरापूरच्या शंकरराव भेलके महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

नसरापूरच्या शंकरराव भेलके महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

October 2, 2026
श्रीगोंद्यात पाणीटंचाई आढावा बैठक; उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

श्रीगोंद्यात पाणीटंचाई आढावा बैठक; उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

October 2, 2026
चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In