• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 3, 2026
in Blog
0
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

कुणबी परिषदेच्या अहवालाचे अनावरण; ‘गाव तिथे शाखा’ उपक्रम राबविण्याचा निर्धार

खेड, दि. १ (प्रतिनिधी) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा खेड (ग्रामीण), कुणबी युवा व कुणबी महिला खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाजोन्नती संघाच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी आमदार व शिक्षणमहर्षी स्व. तु. बा. कदम यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पिरलोटे येथील ह.भ.प. श्री. सरखाराम महाराज गोवळकर यांच्या संतकृपा संकुलातील बँक्वेट हॉलमध्ये गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

RelatedPosts

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

कार्यक्रमास जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा अस्मिताताई केंद्रे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा खेडचे अध्यक्ष शंकर बाईत, खेड ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा आग्रे, कुणबी युवा अध्यक्ष सुरज जोगळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्य मानसी जगदाळे, ग्रामीण महिला खजिनदार साक्षी म्हादे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक अमर राऊत यांच्यासह समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुणबी समाजाच्या जडणघडणीत तसेच समाजाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बाबाजी झुजम (कुरवल, खेड) यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याशिवाय कृषी क्षेत्रासाठी विजय घाणेकर (चिंचघर), वैद्यकीय क्षेत्रासाठी सागर जोगळे (भडगाव), उद्योग क्षेत्रासाठी अनिल काटकर (सुकदर) व प्रेरणादायी कार्यासाठी अंकिता शिगवण (शेरवल), शिक्षण क्षेत्रासाठी राजेश भागणे (तळघर) व प्रेरणादायी कार्यासाठी रसिका रेवाळे/खांडेकर, कला व सांस्कृतिक क्षेत्रासाठी योगेश मुकनाक (तिसे) व प्रेरणादायी कार्यासाठी सूर्यकांत धाडवे (कळंबणी बु.), राजकीय क्षेत्रासाठी सचिन धाडवे (सुकीवली) व प्रेरणादायी कार्यासाठी प्रशांत चव्हाण (भरणे), क्रीडा क्षेत्रासाठी सुप्रिया थोरे, आध्यात्मिक क्षेत्रासाठी राजाराम घाणेकर व सखाराम गोवळकर, प्रशासकीय क्षेत्रासाठी विजय बाईत तसेच अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक प्रबोधन क्षेत्रासाठी संदीप गोवळकर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना अस्मिताताई केंद्रे यांनी कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खेड येथे भव्य कुणबी भवन उभारण्याची गरज व्यक्त केली. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असून महिला सक्षम झाल्यास कुटुंब आणि समाज अधिक सक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दि. ७ जुलै २०२६ रोजी झालेल्या कुणबी परिषदेतील ठरावांच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अहवालाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. परिषदेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तालुक्यातील प्रत्येक गाव आणि कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन गोवळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन बाळू सनगरे यांनी केले. कार्यक्रमास समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

Tags: Sudhir Vairag
Previous Post

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

Next Post

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

Related Posts

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

1
Blog

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

October 3, 2026
5
Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
8
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
15
Next Post
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In