• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 4, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

समित्यांविना कारभार आणि विकासकामांच्या प्रक्रियेबाबत ग्रामस्थांचे सवाल; सीईओंकडे तक्रार करण्याची तयारी

धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर : धर्मपुरी ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन तीन वर्षे उलटूनही विविध समित्यांची स्थापना झाली नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

RelatedPosts

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व बालकल्याण तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागू असलेल्या समित्यांची स्थापना, त्यांचे ठराव आणि कामकाज याबाबत ग्रामपंचायतीच्या अभिलेखात स्पष्ट नोंद आहे का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मागील तीन वर्षांत ग्रामपंचायतीमार्फत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि इतर विकासकामे करण्यात आली. मात्र संबंधित समित्यांची स्थापना झाली नसेल, तर या कामांची निर्णयप्रक्रिया कोणत्या ठराव व मंजुरीच्या आधारे झाली, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. संबंधित कामांचे ठराव, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, कार्यादेश, मोजमाप पुस्तिका आणि देयकांची प्रक्रिया नियमांनुसार झाली का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सदस्य भारत तुकाराम डबडे यांनी यापूर्वीही ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तक्रारी केल्याचे सांगण्यात येत असून, आता या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार करण्याची तयारी असल्याचे समजते.

दरम्यान, समित्या स्थापन न झाल्याचा आरोप आणि विकासकामांच्या प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असून, प्रशासनाच्या चौकशीत नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे धर्मपुरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Tags: Nitin Khilare
Previous Post

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

Next Post

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

Related Posts

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
4
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
11
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
14
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश
Blog

तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

October 4, 2026
5
पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध
Blog

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

October 4, 2026
3
Next Post
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In