• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 4, 2026
in Blog
0
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

सिंदखेड राजा मतदारसंघात विशेष नोंदणी कॅम्प; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांची पाहणी

सिंदखेड राजा प्रतिनिधी

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

सिंदखेड राजा — विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर हा विशेष कॅम्प राबविण्यात येत आहे.

या विशेष कॅम्पच्या कामकाजाची पाहणी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.

कॅम्पमध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांच्या नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे यासंबंधी प्राप्त अर्जांवर कार्यवाही करण्यात येत आहे. प्राप्त अर्जांची वेळेत छाननी करून नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

नवमतदारांनी नोंदणीची संधी साधावी

लोकशाही प्रक्रियेत मतदार यादीचे महत्त्व लक्षात घेता पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. विशेषतः १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी पुढाकार घेऊन मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गावातील मतदान केंद्रावरच नोंदणी आणि मतदार यादीतील आवश्यक दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याचा अतिरिक्त त्रास टाळता येणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या विशेष कॅम्पचा लाभ घेऊन मतदार यादी अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती

या पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अजित दिवटे, नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार संदीप बंगाळे, तसेच नागेश खरात, गणेश देशमुख, रामेश्वर हिरे, बीएलओ आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

Next Post

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

Related Posts

Blog

13
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
6
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
14
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश
Blog

तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

October 4, 2026
7
Next Post

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In