मनवेलपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
विरार : प्रतिनिधी – कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई विभागीय शाखा विरार, कुणबी युवा विरार आणि कुणबी महिला मंडळ, विरार यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद आमची शाळा, मनवेलपाडा, विरार पूर्व येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. कलगी-तुरा कार्यक्रमातून संकलित झालेल्या निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
विभागीय शाखा विरारचे अध्यक्ष किशोर भेरे, युवाध्यक्ष अविनाश पाचकले तसेच कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा नगरसेविका संगीताताई भेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शिक्षणासाठी मिळालेला हातभार यामुळे उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे सरचिटणीस कृष्णा वने, कुणबी बँकेचे संचालक पी. डी. ठोंबरे, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ व युवक मंडळाचे सदस्य तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते.











