२५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण; शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन, मुलींना सायकलींचे वाटप
परभणी | प्रतिनिधी
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापूर्तीचे औचित्य साधत ‘सेवा संकल्प अभियानाची’ सुरुवात परभणीतून करण्यात आली. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
मराठवाड्यासह परभणी जिल्हा दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना, संकटग्रस्त कुटुंबांना प्रत्यक्ष मदत मिळावी या उद्देशाने या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन, तर गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. याशिवाय मराठवाड्यातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी परभणी जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध मागण्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आल्या. परभणी जिल्ह्यात मोठा उद्योग उभारून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, महानगरपालिकेच्या रखडलेल्या निधीचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच मानवत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या ६५ गावांचा पाणीप्र
अनाथांचा नाथ… मदतीचा हात!
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापूर्तीचे औचित्य साधून, ‘सेवा संकल्प अभियानाची’ सुरुवात परभणीतून करण्याचा मान शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी परभणीला दिला.
परभणीसह संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या संकटाला सामोरा जात असताना, केवळ आश्वासने न देता दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला. याच भावनेतून आज दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन, गरजू मुलींना सायकली वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रम ठिकाणी याची सुरुवात केली, याचबरोबर २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज परभणीच्या भूमीतून करण्यात आले. या रुग्णवाहिका मराठवाड्यातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.
‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा शिवसेनेचा विचार आहे. याच भावनेतून संकटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाण्याचे काम शिवसेनेने कायम केले आहे.
आजच्या कार्यक्रमात मी एकनाथ शिंदे साहेबांकडे परभणीच्या विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. परभणी हा कायम दुष्काळाचा सामना करणारा जिल्हा आहे. त्यामुळे परभणीत मोठा उद्योग आणून पाच-दहा हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, नाट्यगृहासाठी निधी द्यावा, महानगरपालिकेच्या रखडलेल्या निधीचा प्रश्न मार्गी लावावा तसेच मानवत तालुक्यातील पाण्यापासून वंचित ६५ गावांसाठी जायकवाडीचे पाणी एअरलिफ्ट करून कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.
परभणीच्या विकासासाठी यापूर्वीही शिंदे साहेबांनी १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज त्यांनी परभणीच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. उद्योगधंदे उभारण्यासाठी मागील महिन्यातच उद्योगमंत्री मा.उदय सामंत यांना सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी तिजोरी ही शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा शब्द आज एकनाथ शिंदे साहेबांनी दिला.
दुष्काळ आणि आत्महत्येमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांतील महिला व तरुणींशी मा. एकनाथ शिंदे साहेबांनी आज स्वतः आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या परिस्थितीची आस्थेने विचारपूस करत “मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका”, असा विश्वास दिला. संकटाच्या काळात या कुटुंबांच्या पाठीशी शासन आणि शिवसेना ठामपणे उभी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकरी व कष्टकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, माता-भगिनी आणि नागरिकांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला साथ दिली. सर्वांचे मनःपूर्वक आभार.









