अक्कलकोट (ता.प्रतिनिधी) अक्कलकोट तालुक्यातील दुधनी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून म्हणावा तसा विकास झाले पाहिजे होता.पण झालेला नाही. भोळ्या-भाबड्या जनतेला आजही पाणी, रस्ते, गटार, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, तरीही सत्ताधारी केवळ विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत, अशी रोखठोक टीका रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा. सैदप्पा झळकी यांनी केली आहे.
शहराच्या विकासाबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात झलकी म्हणाले की, दुधनी ही नगरपरिषद असूनही येथील सामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण होत नाहीत. लोकोपयोगी कामांना प्राधान्य देण्याऐवजी केवळ ठराविक कंत्राटदारांना फायदा होईल अशीच कामे मंजूर केली जात आहेत. यात सत्ताधारी आणि प्रशासनातील काही अधिकारी यांची हातमिळवणी असून केवळ टक्केवारीवर भर दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“वरवर विकासाचे मोठे आकडे आणि गप्पा सांगितल्या जातात, प्रत्यक्षात जमिनीवर काहीच दिसत नाही. जनतेचा साधेपणा,मुग्धपणा व त्यांनी गप्प बसण्याचा फायदा सत्ताधारी घेत आहेत,” असे झळकी म्हणाले.
दुधनीकरांनी आता जागरूक होणे गरजेचे आहे. मूलभूत हक्कांसाठी प्रश्न विचारला पाहिजे. रिपब्लिकन पक्ष जनतेच्या या प्रश्नांवर योग्यवेळी रस्त्यावर उतरून लढा देण्यात यैईल, असा इशाराही सैदप्पा झळकी यांनी यावेळी दिला.
चौकट:
नेमक्या मागण्या काय?
१.पाणी कमी ट्याक्स जादा करु नये
२.प्रलंबित घरकुलचे बिल अदा व नवीन मंजूर लवकर करा.
३. सुरळीत पाणीपुरवठा व नळ गळती दुरुस्ती.
४. अंतर्गत रस्ते, पथदिवे व गटारीचे काम गुणवत्तापूर्ण करावे.
५. कंत्राटी कामांमध्ये पारदर्शकता आणावी.
सैदप्पा झळकी










