आदरणीय उपस्थित मान्यवर आणि पत्रकार बांधवांनो,
मी सारथी महाराष्ट्राचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड.
पत्रकार म्हणजे फक्त बातमी देणारा नाही, तर जनतेचा आवाज आणि समाजाचा आरसा आहे. सामान्य माणसाच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडणे ही पत्रकाराची खरी जबाबदारी आहे.
पत्रकाराची लेखणी ही समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे ती कोणाच्याही दबावाखाली न झुकता सत्य आणि जनहितासाठी चालली पाहिजे.
जनतेचा प्रश्न आमचा प्रश्न,
जनतेचा आवाज आमची ताकद,
आणि सत्याची बाजू घेणे हे आमचे कर्तव्य!
याच विचाराने पत्रकारिता करत राहूया.
जय हिंद! जय महाराष्ट्र!








