भारत कवितके यांना
मुंबई कांदिवली पश्चिम या उपनगरातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांचा वाढदिवस ठिक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.८ आक्टोंबर २०२६ रोजी भारत कवितके ६७ वर्षे पूर्ण करून ६८ वर्षात पदार्पण करीत आहेत, यावेळी भारत कवितके आपल्या आयुष्याला बद्दल भरभरून बोलत होते,,” बालपण, तरुणपण आणि आता वार्धक्य अशा आयुष्याच्या तीन अंकी नाटकातील आपण एक पात्र आहे.आयुष्य हे जसे दुःखानी व्यापले आहे, तसेच ते सुखाने ओथंबून भरलेले सुद्धा आहे, सुख दुःखाच्या दोन किनाऱ्याच्या मधून आपली जीवन नौका चालत असते.
” रंगाचा उघडूनीया पंखा सांज कुणी ही केली,”
झाड फुलांनी आले बहरुन तू न पाहिले डोळे उघडून.”
या ओळींतून आपल्याला निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होतो,मी माझ्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे आणि करीत आहे, आता संघर्षाची मला सवयच होऊन बसली आहे, संघर्ष नाही तर भिडायचे कुणाशी? संघर्षातून मिळालेले यश खूपच आनंददायी असते.” भारत कवितके हे एक कवी, लेखक, पत्रकार, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते,परिक्षक,समिक्षक,मा.होमगार्ड अधिकारी वरिष्ठ पलटन नायक समादेशक अधिकारी के परिमंडळ कांदिवली, सेवा निवृत्त, आणि मुंबई महापालिका आरोग्य खाते भगवती मनपा रुग्णालय बोरिवली शस्त्रक्रियागार सहायक पदावरून सेवा निवृत्त, श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे महासचिव, सार्वजनिक सेवा समिती चाळ चे महासचिव, धनगर विकास मंडळाचे संचालक सदस्य आणि प्रवक्ते,जय महाराष्ट्र सेवा मंडळ कांदिवली संस्थापक व मा.अध्यक्ष अशा विविध पदांवर भारत कवितके कार्यरत आहेत.विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य, गोवा, दिल्ली ओरिसा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात आदी ठिकाणांहून मिळालेल्या पुरस्कारांची संख्या ११७६ झाली आहे,१००० पुरस्कार मिळविण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने भारत कवितके समाधानी आहेत.महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी संस्था व संघटनांच्या लहान मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
भारत कवितके यांची अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत, आगामी तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत, युट्यूबवर त्यांची २८ गाणी प्रकाशित झाली आहेत, गाण्याला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.सध्या त्यांचे आयुष्य उसवताना हे आत्मचरित्र साहित्य क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे.महाराष्ट्र राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये न्यूज चॅनलला भारत कवितके यांच्या बातम्या लेख कविता कथा चारोळ्या व इतर साहित्य सातत्याने प्रसिद्ध होत आहे, अत्यंत मनमोकळेपणाने वावरणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले, आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेले,अनुभवाने परिपक्व असलेले आणि शब्द वेडे असलेले भारत कवितके सर्वत्र लोकप्रिय आहेत. ८ आक्टोंबर २०२६ रोजी भारत कवितके यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.भारत कवितके यांना समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
.. प्रमोद सूर्यवंशी
संपादक, आम्ही मुंबईकर.












