मा. गटविकास अधिकारी कदम साहेब व मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोराळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.
शिबिरास पंचायत समिती सभापती ढोले, उपसभापती बालाजी बर्डे, पं. स.सदस्य शिवाजी साबळे, प्रा. आ. केंद्र रावराजूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोबडे मॅडम तसेच आरोग्य विभाग, पंचायत समिती व रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरात रक्तदात्यांची नोंदणी व वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पात्र ठरलेल्या १४ रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक करून नागरिकांनी नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमातून ‘रक्तदानातून जीवनदान’ हा संदेश देण्यात आला.
रक्तदान करा – जीवन वाचवा!











