पेण, प्रतिनिधी – संदेश नाकते.
पेण : दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी तीन गटांत प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील यश पुढीलप्रमाणे :
- १४ वर्षांखालील मुले : प्रथम क्रमांक
- १७ वर्षांखालील मुली : प्रथम क्रमांक
- १७ वर्षांखालील मुले : प्रथम क्रमांक
अशा प्रकारे पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेच्या तिन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत मानाची भर पडली आहे.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि संबंधित सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.











