धर्माबाद प्रतिनिधी चैतन्य घाटे
धर्माबाद-एक आमदार व दोन कामदार ही भूमिका गेल्या पाच वर्षापासून अगदी एकनिष्ठपणे अमलात आणणाऱ्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पुनमताई पवार यांच्या भात्यात आता शिवाजी अस्त्र आल्यामुळे युवा वर्गात एक प्रकारचे नवचैतन्य आले आहे.
शिवाजी हे आमदार राजेश पवार यांचे मोठे चिरंजीव असून अमेरिकेत ते उच्च शिक्षण घेतलेले आहेत.
विधानसभा निवडणूक२०२४ ची आचारसंहिता घोषित होण्याच्या तब्बल दीड महिना अगोदर ते आपल्या माता-पित्यांची जबाबदारी पेलण्यासाठी भारतात परत आले आहेत .नुकतेच देव देश आणि धर्म ही संकल्पना अमलात आणताना मोठमोठ्या तीर्थसहलीचे आयोजन आमदार दांपत्याने केले होते. त्यावेळी शिवाजी पवार यांची उपस्थिती सर्वांनाच मोहून टाकणारी ठरली! शिवाजी पवार हे अगदी मितभाषी असून सहजपणे ते लोकात मिसळत होते.
त्यांच्या मध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव सत्यात उतरवण्याचा एक ध्यास लोकांना दिसत होता. सर्व वयोवृद्धांची त्यांनी आवर्जून चौकशी करत तीर्थ सहलीला जाताना त्यांचे सामान उचलत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत सर्वांचीच मने त्यांनी जिंकली.
सद्यस्थितीतील विधानसभा निवडणुकीत त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातील सूक्ष्म नियोजनाची जबाबदारी स्वीकारली असून त्यामुळे एक प्रकारचे आत्मबळ हे आमदार पवार दांपत्याला मिळाले असून त्यांचा फायदा भविष्यात नक्कीच नायगाव मतदार संघासाठी होणार आहे.
Discussion about this post