
वणी प्रतिनिधी…..
नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय संस्थांनी स्थानिक प्रोडूसर कंपन्यांना कोठा ठरवून कांद्याच्या खरेदी केला.मात्र, जेव्हा भाव वाढले तेव्हा त्या कंपन्यांनी खरेदी केलेल्या कांद्याची विक्री केली. आता जेव्हा नाफेड आणि एनसीसीएफने ठरवलेल्या मोठ्या प्रमाणे कांद्याची मागणी केली, तर संबंधित कंपन्या खराब झाल्याची ओरड करत आहे. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघर्ष सभा व स्वाभिमानी संघटना मागणी करत आहे.
केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण या योजनेच्या माध्यमातून नाफेड आणि एनसीसीएफ कडून प्रत्येकी दोन लाख 50 हजार मॅट्रिक टन कांदा खरेदीचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने या दोन्ही मॉडल एजन्सीने जिल्ह्यातील महा फेडरेशन व प्रोडूसर कंपन्यांना कोटा ठरवून दर्जेदार, मी कशाप्रमाणे रब्बी कांद्याचे खरेदी आदेश दिले होते अंदाजे पाच लाख टन कांदा खरेदी सहा महिन्यापूर्वी नाफेड आणि एनसीपीएफ या केंद्रीय संस्थांनी उन्हाळी म्हणजे रब्बी कांद्याची खरेदी ही अत्यंत कमी भावात करून तो साठवून ठेवला होता.
पुढे चार सहा महिन्यानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने तोच कांदा कमी भावात खरेदी केलाला कांदा चढत्या भावाने विक्री केला. कांदा महाग झाल्याची ओरड झाल्यावर नाफेड आणि संबंधित प्रोडूसर कंपन्यांना ठरवून दिलेल्या कोट्याची पूर्तता करण्याचे आदेश दिले असता, संबंधित महापौर महा फेडरेशन व इतर कंपन्यांच्या शेडमध्ये चांगल्या दर्जाचा मालक शिल्लक नसल्याचे वास्तव समोर आले.
वास्तवात, संबंधित कंपन्याची तेजी असताना चांगला व दर्जा रब्बी कांद्याची विक्री केली. आता शेड मधील सर्व कांदा खराब झाला असे जाहीर केले. मात्र केंद्राने खरेदी केलेल्या कांद्याचे निकषाप्रमाणे रिकव्हरी निश्चित करून रब्बी कांद्याचा पुरवठा करण्याचा तागादा लावल्याने महा फेडरेशन व इतर प्रोडूसर कंपनीचे दाबे दणाणले आहे. एनसीसीएफ तसेच अधिकारी वर्गाशी संगमत करून संबंधित कंपन्यांनी मागचा पुढचा विचार न करता सरासरी कांद्याची उन्हाळी कांद्याऐवजी चालू हंगामातील लाल कांद्याचा पुरवठा करीत आहेत मात्र यंदा लाल कांदा टिकाऊ नाही.
त्यामुळे या सर्व खरेदी केलेल्या कांद्याची केंद्रीय सतर्कता आयोग मार्फत चौकशी करून जे जे दोषी असेल त्या त्यावर फक्त कारवाई करण्याची अशी मागणी शेतकरी संघर्ष सभा व स्वाभिमानी संघटना यांनी केली आहे.
“प्रतिक्रिया”
लासलगाव वरून रेल्वे ट्रॅक मध्ये उन्हाळ्या ऐवजी नुकताच बाजारात आणलेल्या लाल कांदा लोड केला गेला याचा अर्थ आम्ही”नाफेड वर भ्रष्टाचाराचा केलेला आरोप सिद्ध झाला आहे. राज्य व केंद्र सरकारने यांनी यातील चक्कर चौकशी करून दोषीवर कारवाई करावी.
—- किरण सानप
शेतकरी संघर्ष समिती..
Discussion about this post