११वे कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सव २०२५. चौथा प्रयोग ‘ इथे ओशाळला मृत्यू’ ने सुरुवात..
आजरा: प्रतिनिधी.
आजरा येथे सुरू असणाऱ्या कै. रमेश टोपले स्मृती राज्य स्तरीय नाट्य महोत्सव २०२५ नाट्य प्रयोग चौथा लेखक-वसंत कानेटकर दिग्दर्शक – अनिल आसोलकर लिखित ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ सादर केला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारीत ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ लेखक वसंत कानेटकर आणि दिग्दर्शक – अनिल आसोलकर, हरमल गोवा सादरीकरण केले.
संभाजी महाराजांचा शेवट कसा झाला हे या नाटय प्रयोगद्वारे सादरीकरण केले. संभाजी महाराजांच्या आत्मबलिदानामुळे त्या उद्भूत आणि रोमांचकारी आयुष्याचा कळस झाला. राजांचे सर्वात मोठे गुण म्हणजे साहस आणि निर्धार होय. मोंघलांशी निकराच्या लढाया देवून त्यांनी त्यांची आक्रमणे परतून लावली स्वराज्यातील कट कारस्थाने त्यांनी हाणून पाडली फितूर लोकांना शिक्षा, कडेलोट यासारखे शासन करून वेळीच वटणीवर आणले होते. बंड वेळीच मोडून काढले पोर्तुगिज यांना दमदाटी करून आक्रमणे थांबविली. विजापूर, गोवळकोंडा यासारखे राज्ये त्यांनी यथाशक्ती मदत करून त्यांनी नऊ वर्षे आबादीत ठेवले.
शेवटी राजे मोंगलांच्या कैदेत सापडले मा नाटय प्रयोगाद्वारे त्यांचे वर्तन आणि बाणेदारपणा तसेच कैदेत असताना त्यांनी औरंगजेबापुढे कधीही मान झुकविली नाही. दयेची याचना केली नाही. औरंजेबानी त्यांना हालहाल करून ठेवले होते. शेवटी निर्भयपणे मृत्यूला कवटाळले.
नऊवर्षे स्वराज्य रक्षण सुरक्षित ठेवले. औरंजेबाचे सर्व डावपेच हाणून पाडले. यातून संभाजी महाराजांचे खरे व्यक्तीमहत्व आणि मराठ्यांचा लाडका स्वराज्य आणि शिवपुत्र संभाजी महाराज मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले हे या प्रयोगातून रंगमंच हरमल गोवा यांनी रशिकांना दाखविण्याचा प्रयत्न केला.
या ऐतिहासिक नाटकातील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवराय!
आजचा नाट्य प्रयोग ‘ सितारों से आगे’
लेखक – दिग्दर्शक इरफान मुजावर
Discussion about this post