

यूवा नेते विजय निटूरे यांच्या मागणीला यश…
शिवाजी महाविद्यालय आता छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय नावाने ओळखले जाणार
उदगीर : (श्रीधर सावळे)येथील अनेक वर्षापासून सुरु असलेले शिवाजी महाविद्यालय आता छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय या नावाने ओळखले जाणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी म्हविद्यालयाचे हे नामकरण करण्यात आले आहे.उदगीर येथे सीमा भागातील स्व.माजी आमदार बापूसाहेब पाटील एकंबेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अनेक वर्षापूर्वी किसान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून त्या अंतर्गत शिवाजी महाविद्यालय सुरु केले.काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित बैठकीत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व एस.आर.टि.एम.यू.विद्यापीठ नांदेडचे माजी विद्यार्थी सचिव युवा नेते विजय निटुरे यांनी शिवाजी महाविद्यालय या नावात छत्रपती शिवरायांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असल्याने महाविद्यालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी केली.विजय निटूरे यांनी केलेल्या मागणीची दखल घेवून संस्थेने लागलीच ठराव घेऊन महाविद्यालयाचे नाव छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय असे करण्यास एकमताने मंजूरी दिली. 19 फेब्रुवारी रोजी किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय उदगीर असे नामफलक लावण्यात आले. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ,छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे सर,छत्रपती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व उदगीर येथील प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी छत्रपती शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी मावळे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post