भांबर्डे व क्रांती मित्र मंडळ बो-हाडे मळा येथे शिवजयंती उत्सहात साजरी. बालशिवव्याख्याती ,सृष्टी व श्यामकांत वर्पेचे यांचे व्यख्यान.

शिरुर : शिवाजी महाराजांनी गाजवलेले पराक्रम , राजनीति, प्रशासन, शिलकीचा अर्थसंकल्प आणि महाराजांच्या काळातील सुराज्य या सर्व प्रकारांचा अभ्यास केजी ते पीजी या वर्गात असला पाहिजे असे मत मुख्याध्यापक मारुती कदम यांनी शिवजयंती निमित्त व्यक्त केले.
भांबर्डे (ता. शिरूर ) येथे कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन, न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दोन्ही शाळेच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. विविध वेषभूषा परिधान करून विद्यार्थी जोशपूर्ण घोषणा देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्याध्यापक मारुती कदम मुख्याध्यापक नानाभाऊ नाणेकर आणि कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन चे समन्वयक चेतन डांगे यांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले.
“आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची सुधारणा घडवून आणणे, सामाजिक सलोखा राखणे, महाराजांचा गनिमी कावा, इ. सर्व गोष्टींवरून महाराजांच्या विवेकाचा आदर्श आजच्या पिढीने घेतला पाहिजे. मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांनी जनतेला बाल हक्कांबद्दल जागृत केले. ‘बालमजुरी बंद करा. शिक्षणाला प्रोत्साहन द्या. बालविवाह थांबवा भविष्य घडवा, बेटी बचाव -बेटी पढाव, छत्रपती शिवाजी महाराज की जय.’ अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.” या कार्यक्रमासाठी
कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन चे समन्वयक चैतन्य डांगे ,
अलका काळे, अश्विनी संकपाळ, सुरेश शेळके, बाळासाहेब दिवेकर हे सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे मनोगते झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम गाडे यांनी केले.
Discussion about this post