
दैनिक सारथी महाराष्ट्राचा (ता. प्र.) अनिल डाहेलकर..
मुर्तिजापूर : भारतीय संविधानाने दिलेल्या हक्काविषयी बहुजन समाजात जाणीव जागृत करणे ही काळाची गरज आहे, असे परखड मत प्रा. डॉ. एम. आर. इंगळे सर यांनी मूर्तिजापूर येथे बौद्ध सेवा संघाच्या३८ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य जनजागृती धम्म मेळाव्यात व्यक्त केले.
दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी बौद्ध सेवा संघ मूर्तिजापूरच्या वतीने भव्य जनजागृती धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात समयी प्रज्ञादीप बुद्ध विहार श्रीराम नगर सिरसो येथे बौद्ध सेवा संघाच्या मुख्यालयावर धम्म ध्वजारोहण करून भदंत अश्वजीत यांच्या मंगल वाणीने बुद्ध वंदना सूत्र पूजा पाठ घेण्यात आला. यावेळी बौद्ध सेवा संघाचे पदाधिकारी आणि उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भव्य जनजागृती धम्म मेळावा शहराच्या मध्यभागी असलेल्या राधा मंगलम या मंगल कार्यालय मध्ये आयोजित करण्यात आला होता. मेणबत्ती प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमा अभिवादनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात यावेळी विचार मंचावर पूज्य बनते अश्वजीत जी यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ. एम. आर. इंगळे सर माजी वाणिज्य विभाग प्रमुख श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अकोला हे उपस्थित होते .त्यांनी भारतीय संविधान या विषयावर अभ्यासपूर्ण सखोल व परखड मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रमेश वाघमारे वैद्यकीय विदर्भ महाविद्यालय अमरावती यांनी केले .त्यानंतर डॉ. विक्रम शर्मा मुर्तीजापुर यांनी ‘जगाला भगवान बुद्धाच्या धम्माची गरज आहे‘ .या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच बौद्ध सेवा संघाचे सचिव देवराव खंडारे यांनी चला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून भगवान बुद्धाकडे या विषयावर अमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी समाजभूषण, धम्म प्रचारक संघनायक संभाजी शिरसाट यांनी आंबेडकरी चळवळीत बौद्ध सेवा संघाचे योगदान या विषयावर प्रेरक मार्गदर्शन करून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतूनच बौद्ध सेवा संघाची मी स्थापना केली, गेल्या 38 वर्षापासून बौद्ध सेवा संघांनी अनेक समाज उपयोगी कार्य करून एक आदर्श पायंडा निर्माण केला,असे मत व्यक्त करून जनसमुदायाला बौद्ध धम्म विषयी अमूल्य माहिती दिली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इंजिनिअर दादासाहेब वाकोडे हे उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा धावता आढावा घेऊन आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवून प्रत्येक गोष्टीची समीक्षा करावी आणि बुद्ध विहार हे संस्कार केंद्र व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.नारायण राऊत यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.जी. डी. इंगोले सर मुर्तीजापुर यांनी मानले. या कार्यक्रमाला बौद्ध सेवा संघाचे सर्व पदाधिकारी , ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक प्रा.डॉ. सी. जी. कांबळे , प्रा.व्ही.आर.कांबळे,सुप्रसिद्ध कवी मिलिंद इंगळे, डॉ.सुरज खंडारे ,शैलेश गुप्ता आणि तालुक्यातील उपासक-उपासिका तसेच फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता संपूर्ण जनसमुदायास बौद्ध सेवा संघाच्या वतीने भोजन देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत बुद्ध भीम गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीचे मिशन गायक युसुफभाई चिस्ती कामरगाव आणि आंबेडकरी चळवळीचे मिशन गायक सचिन नागवंशी मानोरा यांचा दणदणीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उत्कृष्ट संगीतकार सुदर्शन शिरसाट हार्मोनियम वादक, मंगेश गवळी बँजो वादक, प्रवीण किर्दक तबलावादक, अंकित थोरात तबलावादक ,विपुल गोपनारायण ढोलक वादक ,सुनील इंगळे ढोलक वादक यांची उपस्थिती होती. यावेळी कोरस गायक म्हणून महादेवराव पाटील खांदला, धम्माभाऊ राऊत मूर्तिजापूर, योगेश वाहूर वाघ यांची भूमिका महत्त्वाची होती.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मनोज अंबादासराव भटकर, विठ्ठल उमाळे, रामकृष्ण मोहोळ, ज्ञानदेवराव नाईक,किसनराव खंडारे, भीमराव चक्रे, राहुल वानखडे हिम्मतराव वाघ,एकनाथराव इंगळे, जनार्दन इंगळे, विलासराव गवई सरपंच सिरसो, बाबूलाल खंडारे ,प्रकाश ढोके, मधुकरराव भटकर यांच्याशी इंगळे संतोष राऊत सुजाताबाई वानखडे , उषाबाई शिरसाट यांनी अथक परिश्रम घेतले..
Discussion about this post