गोंडपिपरी :- दि.२३ फरवरी राजुरा विधानसभा क्षेत्राचे सेवाभावी आमदार श्री देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून गोंडपिपरी येथील कला वाणिज्य महाविद्यालयात आज भव्य महाआरोग्य शिबिर पार पडले. या शिबिराचा गोडपिंपरी तालुका व शहरातील २४७६ शिबिरार्थींनी लाभ घेतला.
देव देवळात नाही तर माणसात आहे ; समाजातील रंजल्या – गांजल्यांची सेवा करण्यासारखे पुण्य नाही असा संदेश देत मानव सेवेचे मूल्य पटवून देणाऱ्या वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज यांच्या जयंती दिनी आजचे भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न होत आहे .याचे मनस्वी समाधान वाटते. आजच्या शिबिराचा २४७६ शिबिरार्थींनी लाभ घेतला आणि ईश्वराचा अंश असलेल्या गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची ही ईश्वरीय संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला लाभली हे मी माझे भाग्य समजतो. असे प्रतिपादन आमदार श्री देवराव भोंगळे यांनी केले.
गोंडपिपरी येथील कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये मा.आ. श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र , भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी ( मेघे ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य महा आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना , हे खरे आहे की गोंडपिपरी तालुक्याने भारतीय जनता पार्टी आणि माझ्यावर कायम प्रेम केले आहे . या विधानसभा निवडणुकीतही गोंडपिपरी तालुक्याने मला भरभरून आशीर्वाद दिला. तुमच्या या आशीर्वादाला मी उतरांई होऊ शकणार नाही. परंतु तुम्ही दिलेल्या लोकसेवेच्या संधीच सोन करून तुमच्यासाठी पहिला सेवेकरी म्हणून उभा राहील असा शब्द देतो. अशी भावना ही आमदार श्री देवराव भोंगळे यांनी यावेळी व्यक्त केली.
सकाळीच सुरू झालेल्या या शिबिरात नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, दंतरोग, कान नाक घसा, त्वचारोग, मेडिसिन व कॅन्सर यासारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी शिबिरार्थींची तपासणी केली. यामध्ये तपासणी झालेल्या २४७६ रुग्णांपैकी ८१२ रुग्ण हे विविध शस्त्रक्रिये करिता पात्र ठरले. त्यांचे वर टप्प्याटप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे शस्त्रक्रिया होणार असून ४० शिबिरार्थीची रुग्णा तुकडी आज रवाना झाली.
Discussion about this post