
बाळासाहेब नेरकर कडून..
मनुष्येत्तर प्राणी ही केवळ भोग योनी असल्याने वेदत्रयीची नियमावली त्यांना लागू पडत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाअभावी आत्मोद्धाराच्या साधनेला कुठलाही वाव नाही. दुर्मिळ असणाऱ्या मनुष्य योनीमध्ये मात्र आहार , निद्रा , भय व मैथूनाव्यतिरिक्त भगवंतानी प्रदान केलेल्या ज्ञानाधिक्यामुळे तो व्यक्तिगत तथा सामूहिक साधनेद्वारा स्वतःसह इतरांच्याही उद्धाराचा मार्ग प्रशस्त करू शकतो. म्हणून सामूहिकरीत्या जिचे गान केले असता जी वर्णाश्रम तथा उचनिचत्विचा भेद न करता सर्वांना समर्थपणे तारू शकते अशी अखिल मानव मात्रांची गायत्री म्हणजेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा असल्याचे निष्ठापूर्वक मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेव जी महाराज अवतीर्णोत्सव मूर्तीप्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून सालाबाद आणि याही वर्षी श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित असणाऱ्या सामूहिक गाथा पारायण व प्रवचन सप्ताहातील प्रथमपुष्पगुंफीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा ही मानवी जीवनाची आजीवन आदर्श आचारसंहिता असून तद्नुसार जीवन जगणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे सर्वसामान्य माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. अर्थातच तो व्यक्ती संसारिक क्षेत्रामध्ये जरी कार्यरत असला तरी त्याला लोक साधू वा सत्पुरुष म्हणूनच सन्मान देत असतात.
एकूणच गाथा हे वाल्याचा वाल्मीक ऋषी बनवून , सामान्याला सत्पुरुषत्वापर्यंत पोहोचविण्याची गुरुकिल्ली आहे. असे अनेक उदाहरणे देऊन बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या श्रोतेमंडळी समोर महाराजांनी गाथेचे महत्व समजावून सांगितल्याचे तसेच याहीपेक्षा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.
[24/02, 1:21 pm] Balasaheb Nerkar: गाडगे बाबांची 149 जयंती लाउपवर- वधु परिचय मेळाव्याचे आयोजन करुन दिला मानाचा मूजरा..
दै. सारथी महाराष्ट्राचा : प्रतिनिधी: अनिल डाहेलकर
२३ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वच्छतेचे जनक, थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची १४९ वि जयंती बाबांचे जन्मगाव शेंडगांव ता.अंजनगांव येथे पार पडली. या जयंतीच्या शुभ पर्वावर समाज एकत्रित यावा व समाजातील मुला -मुलींचे नातेसंबंध जोडण्याच्या उद्देशाने डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र तथा बाबाचे वंशज जानोरकर परिवार शेंडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य उपवर – वधु परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेंडगांव येथील नवीनच तयार झालेल्या विकासनीधी मधील शासकीय इमारतीमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम मान्यवरांनी बाबांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करून बाबांना मानवंदना वाहिली त्यानंतर कार्यक्रम स्थळी गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.डेबुजी यूथ ब्रिगेड महाराष्ट्र चे मार्गदर्शक श्री विश्वनाथ राऊत सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित असलेल्या समाज बांधवांसमोर बाबांचे विचार मांडत एकत्रिकरणाचे करण्याचे महत्त्व पटवून दिले. या मेळावा मध्ये काही समाज सुधारक काम करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार सुद्धा आयोजकांतर्फे करण्यात आला. या मेळाव्या करता अमरावती, अकोला ,वाशिम ,यवतमाळ ,नागपूर, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातील समाज बांधव आलेले होते. शेंडगाव येथे झालेला परिचय मेळावा पहिल्यांदाच आयोजित केल्याचे डेबूजी युथ ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राहुल वरणकार यांनी सांगितले.या मेळाव्याला महाराष्ट्र युवक काँग्रेस सचिव नितेश दादा वानखडे यांच्यासह बुद्धभूषण गवई, जगदीश कांबे यांनी सुद्धा भेट दिली असता आयोजकांनी त्यांचा सुद्धा सन्मान केला. या परिचय मेळाव्यामध्ये आलेल्या वधू-वरांनी सर्वांसमोर उभे राहून आपला परिचय दिला तेव्हा सभागृह समाज बांधवांनी भरून निघाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नैनेश माहुलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल कडूकार यांनी केले. या मेळाव्यात वर म्हनून 120 तर वधू म्हनुन 32 यूवतिनी सहभाग घेतला
पुढील येणाऱ्या जयंतीला सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा मानस !सुद्धा आयोजकांनी केला आहे.
यावेळी मंचावर राहुल भाऊ वरणकार, डेबूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र, मार्गदर्शक विश्वनाथ राऊत सर राहुल कडूकार, गाडगे बाबांचे वंशज प्रवीण जानोरकर, नितीन जानोरकर, ह भ प ज्ञानेश्वर महाराज मदनकर, सुषमाताई अमृतकर, शिवम शेवाने गजानन सोळंके सरपंच शेंडगाव, स्वप्निल साबळे उपसरपंच शेंडगाव, अरुण शेवाने इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राजेश शेवाने,गणेश बेलूरकर रमेश सांबस्कर,विमल खंडारे, अवधूत तिडके, पत्रकार मंगेश बोरकर, सुनील जवंजाळकर, नरेंद्र जानोरकर, अनंत जानोरकर, पंकज ठाकरे, गोपाल रामेकर, सुधीर शामतकर, अतुल बोरेकर,राम डायलकर,, भूषण सरदार,, पंकज पवार, सचिन शामतकर, विशाल कौलकर, सौरभ वरणकर,,संतोष रामेकर, शुभम माहुलकर, गणेश बेलुरकर, विजय सोनोने,ईत्यादीच्या सहकार्याने पार पडले..
Discussion about this post