दानोळीतील बैठकीत शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दिला : कोऱ्या कागदावर विरोध लिहून देतो म्हणणारे आ.यड्रावकर तोंडघशी..
दानोळी (दै.अप्रतिम) :
यड्रावकर गट आणि फसवा – फसवी हे चित्र कायम राहणार असे बोलले जात असतानाच काल यड्रावकर गटाची दुतोंडी भुमिका समोर आल्यामुळे नक्की हा गट विचारांवर चालतो की पैशाच्या कारणातून रोज भुमिका बदलतो असा सवाल विचारण्यात येऊ लागलेला असून दोनच दिवसापुर्वी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करावा म्हणून जयसिंगपूरातील सहाव्या गल्लीतील टायर दुकानात शेतकऱ्यांनी आ.राजेंद्र यड्रावकर यांची भेट घेऊन शक्तीपीठबाबत भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती, त्यावेळी कोऱ्या कागदावर सही करून विरोध जाहीर करू का ? असा सवाल आ. यड्रावकरांनी विचारला असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगीतले होते त्यामुळे यड्रावकरांचा शक्तीपीठला विरोध असल्याचे स्पष्ट झाले होते तर काल यड्रावकर गटाचे प्रमुख नेते असलेल्या व शरद कारखान्याच्या संचालिका सौ. नांदणे यांचे पती कोथळीतील यड्रावकर गटाचे प्रमुख संजय नांदणे यांनी शेतकऱ्यांना योग्य पैसे मिळणार असतील तर शक्तीपीठला पाठिंबा देण्यात हरकत नसल्याची भुमिका मांडल्यामुळे पैसे दिले की वेगळी भुमिका आणि पैसे नाही दिले तर वेगळी भुमिका हे फक्त पैशाभोवती फिरणारे यड्रावकर गटाचे राजकारण तालुक्यात चर्चेचा विषय ठरले असून संजय नांदणेंनी थेट नेत्यांच्या भुमिकेच्या विरोधात भुमिका घेतल्यामुळे यड्रावकर गटात ऊभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून, संजय नांदणेंचीच भुमिका ़योग्य असल्यामुळे यड्रावकर गटातील प्रमुख नेते असलेल्या राजेंद्र यड्रावकरांनाही आत्ता संजय नांदणेंच्या भुमिकेच्या मागे फरपटत जावे लागणार असे स्पष्ट चित्र सध्या दिसू लागले आहे.
यड्रावकर गटाचे संपुर्ण राजकारण फक्त पैशावर अवलंबून आहे. यड्रावकर गटातील कोणीही पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. परवाच्या विधानसभा निवडणुकीत ही त्यांनी मताला तब्बल अडीच हजार रुपये वाटून आमदारकी विकत घेतली असल्याची तालुक्यात चर्चा असतानाच आत्ता शक्तीपीठमध्ये जास्त पैसे मिळणार असतील तर पिकावू जमीनी देण्याची तयारी असल्याचे गटाती नेत्यांची भुमिका समोर आल्यामुळे या गटाकडे विचार, आचारसंहिता, नैतिकता या गोष्टींशी काहीही देणेघेणे नसून फक्त पैशासाठी राजकारण करणारा, पैशासाठी काहीही करायला तयार असणारा गट म्हणून या गटाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
संजय नांदणेंनी घेतलेली भुमिका ही नेत्यांच्या परवानगी नेच घेतली असणार यात कुणालाही शंका वाटत नाही, मात्र एकीकडे विरोध करायचा व दुसरीकडे पैशा मिळत आहेत म्हणून भुमिका बदलायची असे सुरू असलेले यड्रावकर गटातील नेत्यांचे प्रयत्न नक्कीच शिरोळ तालुक्यातील राजकारणाची अत्यंत खालची पातळी दाखवणारे आहेत हे मात्र नक्की, यामुळे यड्रावकर गटावर विश्वास ठेवून कोणतेही काम करायचे नसते हे पैशासाठी कोणत्याही थराला जाऊन विचारांना तिलांजली देऊ शकतात अशी चर्चाही तालुक्यातील विरोधकांमध्ये सुरू असून यड्रावकर गटाची बदलती भुमिका त्यांचीच नाचक्की करणारी ठरू लागली असल्याचे चित्र आहे..
Discussion about this post