
बारामती: खोरोची, इंदापूर या गावातील मागच्या आठवड्यात रामोशी समाजातील तरूण युवक कै.उत्तम जालिंदर जाधव याची काही गुंड प्रवृत्तीच्या दहा ते बारा युवकांनी आज्ञातस्थळी एकट्याला गाठून त्याची निर्घृण अशी हत्या करण्यात आली आहे.. त्यांच्याच निषेधार्थ बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांना लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब जय मल्हार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा व बारामती तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले..
यामध्ये आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी देण्यात यावी, मोका अंतर्गत कारवाई करावी,तसेच मयत कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी अशा विविध प्रकारच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.
त्वरित कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा या निमित्ताने देण्यात आला.. यावेळी जय मल्हार क्रांती पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,बारामती तालुका अध्यक्ष महेंद्र भंडलकर,चांगदेव भंडलकर,वाकी गावचे सरपंच किसनराव बोडरे,नरेश खोमणे,नानासो जाधव,प्रवीण मदने आनंदा खोमणे,सागर खोमणे,नवनाथ माकर,नितिन माकर,सोनगावचे अध्यक्ष चव्हाण आदी समाज बांधव उपस्थित होते..


Discussion about this post