
सोयगाव : शैक्षणिक कार्य करतांना विद्यार्थ्यांसह पालक गावकऱ्यांनी वेळोवेळी मोलाचं सहकार्य केले — अण्णा पोळं..
सोयगाव :
वयाच्या अठावनव्या वर्षात आणि जिल्हा परिषद शैक्षणिक कार्य करण्यासाठी गेली अडतीस वर्ष अविरत स्वतःला असे झोकून दिलं की, इतके दिवस कसे निघून गेले हे कळलेच नाही.या काळात मला शैक्षणिक कार्य करतांना विद्यार्थ्यांसह पालक गावकऱ्यांनी वेळोवेळी मोलाचं सहकार्य केल्याचे केंद्रिय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा फर्दापूर केंद्र प्रमुख अण्णा पोळ शुक्रवारी (दी..२८) सेवापूर्ती सोहळ्यात सत्काराला उत्तर देतांना म्हणाले.
वरखेडी तांडा शाळेचा विकासासह विद्यार्थांची गुणवत्ता साधने, शाळेच्या भिंती बोलक्या करने, शालेय स्तरावर विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक व वक्तृत्व स्पर्धा , क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीपर्यंत नेण्याचे काम गावकऱ्यांच्या सहकार्याने केले गेले आहे असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेडी (बु ) येथील शिक्षक तथा केंद्र प्रमुख अण्णा पोळ हे अडतीस वर्षांनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त निमित्ताने गावकरी व शिक्षकांनी मोठ्या दिमाखात शिक्षक पोळ यांचा सेवा पूर्ती सोहळा साजरा केला.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव होते ,
कार्यक्रमास ग.शि.आढाव, मु.अ. रविंद्र शेळके,शकुर शेख श्री अमृतेश्वर शिक्षक पत संस्था मर्या सोयगाव चेअरमन,शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष किरण पाटील,के.प्र.दुर्गादास बलांडे मु . अ. मंगलसिग पाटील, आर.आर.कठोरे, सुनील बावचे सुपडु सोनवणे, उमेश सरोदे जामठी , कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, शालेय शिक्षकांसह शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, नागरीक, पत्रकारांनी उपस्थिती लावली होती.
अध्यक्षीय भाषणात रंगनाथ आढाव बोलतांना म्हणाले की, पोळ हे नियत वयोमानानुसार शुक्रवारी सेवा निवृत्त होत असल्याने ” कही खुशी कही गम आमच्यातून एक उत्कृष्ट सहकारी आज निवृत्त होत असल्याने या पुढे आम्हाला येणाऱ्या अंडी अडचणी, आणि शैक्षणिक काम सांगता येनार नाही याच दुःख आहे. तर निवृती नंतर ते आपल्या घर परिवारात स्थिरावणार असुन लेकरा बाळात वेळ देणार असल्याचा सुध्दा आम्हाला आनंद आहे..
Discussion about this post