
प्रतिनिधी रमेश जगताप..
राज्यात पहिल्यांदाच 20000 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत जालना जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये 28 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता पंधरा हजार रुपये जमा झालेला आहे. घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी केवळ एक लाख वीस हजार रुपये आणि बाथरूम साठी 18 हजार रुपये मिळणार आहेत. आता काही लाभार्थ्यांनी जुनी मातीची घरी पाडले आहेत. I
बांधकामाची तयारी केली आहे. परंतु बांधकामासाठी कुठेही वाळू मिळत नाही त्यामुळे घराचे काम कसे करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दुसरीकडे वाळू मिळाली तर त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे यात रमाई योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मोजावे लागत आहेत घरकुलाच्या बांधकामासाठी सहा ते सात ब्रास वाळू लागते त्यासाठी 28 ते 35 हजार रुपये लागत आहेत परिणामी दिलेले अनुदान कमी पडत आहे. ( लाभार्थी सापडले संकटात ) दोन वर्षापासून घरकुल मंजुरीची प्रतीक्षा होती आता घरकुल मंजूर झाली असून खात्यावरही पहिला हप्ता जमा झाला आहे बांधकामाची तयारी देखील केली आहे मात्र त्यासाठी वाळू सहजपणे उपलब्ध होत नाही वाळूसाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे त्यामुळे बांधकाम करावे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे बांधकाम केले नाही तर दुसरा हप्ता जमा होत नाही परिणामी लाभार्थी संकटात सापडले आहेत., ( साहेबराव मोरे लाभार्थी )((((((( वरिष्ठांशी चर्चा करणार भोकरदन तालुक्यात 7111 घरकुल मंजूर झाली आहेत त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात 15000 पहिला हप्ता जमा कर टाकण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुल बांधण्यास सुरुवात करावी प्रशासनातर्फे वाळू उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली जाईल.( संतोष बनकर तहसीलदार भोकरदन )
Discussion about this post