
नाशिक | प्रतिनिधी… विनोद साळवे…8788008657
दुचाकी व चारचाकी चालकांसह नाशिक शहर काँग्रेसचा कारवाईस तीव्र विरोध असताना ठेकेदाराने पहिल्याच दिवशी २१ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून नऊ हजार ७२० रुपयांचा दंड आकारला.
शहरातील बेशिस्त वाहनधारकांना चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने दोन टोइंग ठेकेदारांना कंत्राट दिले आहे.
शहरात अधिकृत वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसल्याने पोलिस आयुक्तालयाने महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका व गंगापूर पोलिसांच्या हद्दीत टोइंग करण्यास सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ बऱ्याच वर्षानंतर नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प पोलिसांच्या हद्दीतही टोइंग होणार आहे. त्याचीही सुरुवात येत्या एक दोन दिवसांत होणार असून नागरिकांच्या सुविधेसाठी जेथून वाहने उचलण्यात येतील, त्याच भागात जमा होणार आहेत त्यामुळे कंत्राटदारांनी टोइंग शुल्कातही काहीसे फरक ठेवले आहेत, परंतु, त्यामुळे नागरिकांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
मे २०२४ मध्ये नाशिक पोलिसांनी वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी टोइंग कारवाईला हिरवा कंदील दर्शवला होता. सात महिने या कारवाईतून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल झाल्यानंतर कंत्राटाची मुदत न वाढवता डिसेंबर २०२४ मध्ये कारवाई थांबवली होती. आता ही कारवाई पुन्हा सुरु झाली असताना बेशिस्त वाहतूक व पार्किंगच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे
बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी करारातील नमूद अटी-शतींसह दरानुसार टोइंगच्या दोन वेगवेगळ्या कंत्राटाला कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार, ६ मार्च २०२५ पासून सरकारवाडा विभागात पुन्हा टोइंग कारवाई सुरु झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे. रस्त्यावर बेशिस्तरित्या वाहने उभी करु नयेत, अन्यथा, वाहने टोइंग करून दंड आकारला जाईल, असे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. शहरात वाहनतळांची संख्या अपुरी असून, अनेक ठिकाणी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यामुळे पहिल्यांदा वाहनांसाठी पुरेशी जागा आणि वाहनतळांची निश्विती होणे अपेक्षित आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने महापालिकेस फलक लावण्याची सूचना केली आहे.
गुरुवारी झालेल्या टोइंग केसेस
दुचाकी केसेस
१८
दंड शुल्क
रु.८,७४८
चारचाकी केसेस
दंडशुल्क
रु. २७२
एकूण कारवाया
२१
एकूण दंड आकारणी
रु.९,७२०
Discussion about this post