
प्रशांत टेके पाटील /अहिल्यानगर संपादक –
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कंपनीच्या परीसरातील सर्व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. या कंपनीत चंद्रपूर येथील खाणीतून दगडी कोळसा घेऊन येणार्या ४० / ५० टन वजनाचे तीस ते चाळीस ट्रक व डंम्पर आदी अवजड वाहनांची नियमितपणे वाहतूक सुरू असते. गावातील रस्त्यांची वाहतूक क्षमता अवघी १५ टनांपर्यंत असताना कंपनीत कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक्स व कंपनीत तयार झालेल्या केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या २० ते २५ कंटेनरची वाहतूक क्षमता सुद्धा चाळीस टनांच्या पर्यंत असते. सदर कंपनीत या अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे परीसरातील सर्व रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दिवसेंदिवस खड्ड्यांची रुंदी वाढत चाललेली आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या वाहनाला साईड देताना दुसऱ्या वाहनास बाजूला घेताना हमखास खड्ड्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो.त्यामुळे या रस्त्यांवर कायमच अपघाताची मालिका असते. त्यामुळे अनेक वाहनधारकांना छोट्या मोठ्या जखमा होतात तर काहींचे हातपाय मोडले जातात.त्यातून कायमचे अपंगत्व आलेले काही व्यक्ती आहेत. तरी सुद्धा कंपनी या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने न घेता दुर्लक्ष करून वेळ मारुन नेत असल्याचे दिसत आहे. जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा तर या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अक्षरशः दुचाकी वाहने तर घसरुन रस्त्यांच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जातात त्यामुळे दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागते.तर विद्यार्थी व विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी जिव मुठीत धरून जावे लागते. पावसाळ्यात वृद्धांचे या रस्त्यावरुन जाणे येणे बंद झाले आहे. सदर कंपनीने वारी परिसरातील सर्व रस्ते काँक्रीटचे केले पाहिजे होते.पण रस्त्यांचे डांबरीकरण काय ? पण रस्त्यांवर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात मुरुम सुद्धा टाकला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. सदर कंपनी शासनाने रस्त्यांची दुरुस्ती करावी याची वाट पाहत बसलेली आहे काय ? कंपनीने सामाजिक दायित्व म्हणून तरी रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती व मजबूती करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.सदर कंपनीच्या अवजड वाहनांची वाहतूक सातत्याने होत असल्याने कंपनीने वारी परिसरातील सर्व रस्ते काँक्रीटचे केले पाहिजे, असे सुज्ञ नागरिकांनी अपेक्षा आहे. // “वारी परिसरातील सर्व रस्त्यांची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे मागितलेली आहे. “. वारी ते पुणतांबा, वारी ते कान्हेगाव फाटा भोजडे चौकी संवत्सर, वारी ते भोजडे धोत्रे वैजापूर, वारी ते शिंगवे शिर्डी, वारी ते सडेफाटा कोपरगाव आदी सर्व रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे.या सर्व रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या सर्व रस्त्यांवरुन गोदावरी बायोरिफायनरीज कंपनीचे केमिकल्सच्या वाहतूक करणाऱ्या ४० ते ५० टनेज क्षमतेचे मोठमोठ्या कंटेनरची , तसेच कोळसा वाहतूक करणाऱ्या डंपरची आदीसह विविध प्रकारच्या वाहनांची वाहतूक सातत्याने चालू असते.त्यामुळे वारी परीसरातील सर्व रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे.क्षमतेपेक्षा जादा टनेज लोडिंगच्या वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्ते खराब होत आहेत. त्या संदर्भातील अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोपरगाव उपविभागीय कार्यालया कडून मागितलेला आहे. प्रसाद हरीभाऊ जाधव, राहणार – वारी.//. क्रमशः
Discussion about this post