
प्रा. दिलीप नाईकवाड..
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी )
स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये २०२३-२४ मधील गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापक यांना सन्मानित करण्यासाठी गुणवंत सत्कार समारोह आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. चंद्रशेखर जलतारे वरिष्ठ अधिवक्ता, उच्च न्यायालय, नागपूर, राजकीय विश्लेषक प्रा. बी. वाय. कुलकर्णी, नागपूर उच्च न्यायालय बार असोसिएशन सेक्रेटरी ॲड. अमोल जलतारे, सौ. सुचिता चंद्रशेखर जलतारे, महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे हे उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित गुणवंत सत्कार समारंभ प्रसंगी ॲड. जलतारे यांनी मार्गदर्शन करताना आपण या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे मत व्यक्त केले. प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बोलताना विचार करून बोलावे असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी सर्व गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने सातत्यपूर्ण प्रयत्न करून निश्चित ध्येय साध्य करावे असे आवाहन केले.
या सत्कार समारोहामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विविध विषयात तसेच वर्गांमधून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व श्यामची आई हे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा देखील सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. बी. यू. काळे यांनी तर अतिथी परिचय प्रा. सौ. मंजुषा मुळे यांनी करून दिला.
प्रमाणपत्र वाचन प्रा. सोपान चव्हाण व प्रा. डी.एम. शिंब्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पत्रकार मुन्ना ठाकूर, दयासिंग बावरे, विजय जाधव यांच्यासह विद्यार्थी त्यांचे पालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रति,
मा. संपादक / पत्रकार
दैनिक / साप्ताहिक ……..
कृपया वरील बातमीस आपल्या लोकप्रिय दैनिकात / साप्ताहिकात प्रसिद्धी द्यावी, ही विनंती..
Discussion about this post