
यावल प्रतिनिधी,फिरोज तडवी..
यावल तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील १२ तासांपासून वन विभागाची शोध मोहीम सुरू असली तरी बिबट्या अद्याप सापडलेला नाही. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, नागरिकांनी बिबट्या व इतर हिंसक प्राण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी केले आव्हान.
: यावल तालुक्यातील साकळीच्या मानकी शिवारात दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका सात वर्षीय आदिवासी मुलावर हल्ला करून त्याचा बळी घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर तालुक्यात विविध भागांमध्ये बिबट्या दिसल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर गांभीर्याने लक्ष देत यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे आणि पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांना विशेष सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
बिबट्याचा वावर लक्षात घेता यावल तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृती मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. हिंसक प्राण्यांपासून बचावासाठी नागरिकांना योग्य ती माहिती देण्यात येत आहे. विशेषतः जंग परिसरात शेती करणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी अधिक काळजी
यावल पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी नागरिकांना कुठलाही हिंसक प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच जबाबदार आणि सुज्ञ नागरिकांची भूमिका पार पाडावी, असे आवाहन केले आहे.
आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी विधानसभेत केली मदतीची मागणी…
सदर घटनेची माहिती चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनाही देण्यात आली असून सदर घटनेबाबत कुटुंबाच्या मदतीसाठी तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. तसेच याबाबत त्यांनी विधानसभेच्या सभागृहात पीडित कटंबाला मदत देण्याची…
Discussion about this post