
रविवार, दि : ९ मार्च२०२५ (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे युवानेते रितेश वाघमारे यांनी खासदार श्रीरंग बारणे व यांच्या उपस्थितीत शिवसेनेत(एकनाथ शिंदे गट) मध्ये अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.यावेळी विशाल हुलावळे – युवासेना शिवसेना तालुकाप्रमुख मावळ व श्री.अमित कुंभार यावेळी उपस्थित होते.रितेश वाघमारे हे कट्टर-निष्ठावंत युवा शिवसैनिक आहेत. बहुजन समाजाच्या उत्थान आणि प्रगतीसाठी वेळोवेळी त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केलेली आहेत. त्यांचे संघटनकौशल्य, वक्तृत्वशैली, जनसामान्याविषयीची तळमळ प्रभावी आहे. विविध सामाजिक कार्यातून युवा कार्यकर्त्यांचे मोठे संघटन त्यांच्याजवळआहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली सोबत असलेल्या युवा कार्यकर्त्यांसह यापुढे समाज आणि पक्षहिताचे कार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे..
Discussion about this post