“बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तोंडाला काळ्याफिती व काळे झेंडे दाखवून हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या वतीने निषेध..!”
बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव साहेब तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या सूचनेनुसार व मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हातकणंगले येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळे झेंडे व तोंडाला काळ्याफिती बांधून निषेध नोंदवण्यात आला.

बदलापूर घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी उपस्थित आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील मगदूम, तालुकाप्रमुख बाबासो शिंगे, युवासेना उपजिल्हाधिकारी अनिल माने, विनोद पाटील, धोंडीराम कोरवी, विजय भोसले, दीपक कोळी, आनंद सिदरत, युवासेना तालुकाप्रमुख देवाशीष भोजे, अंकुश माने, सुनील माने, विष्णू पाटील, दीपक मोरे, पांडुरंग सौन्दलगे, आप्पासो सादळे उमेश शिंदे, गणेश नाईक, विशाल साजणीकर, सागर जाधव, अनिल कदम, मंदार गडकरी, संतोष कांबळे, सुनील वड्ड, प्रियदर्शन पाटील, सुशांत भोसले, अजित देवणे, अर्जुन जाधव, मनीष कुलकर्णी, शिवाजी जाधव, संतोष खरातव इतर शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post