“पोटेगाव वनपरिक्षेत्राच्या वतीने वनमहोत्स व एलपीजी गॅसचे वाटप..”
चामोर्शी :
वनविभाग गडचिरोली, वनपरिक्षेत्र कार्यालय पोटेगाव अंतर्गत येणाऱ्या
उपक्षेत्र पुस्टोला येथे वणमहोत्सव साजरा करण्यात येऊन “एक पेड़ माँ के नाम “अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

संयुक्त वन व्यवस्थापन समिती भापडा तर्फे २५ लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला पोटेगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल तांबरे, संयुक्त वनव्यवस्थपन समिती भापडा येथील अध्यक्ष सावजी पदा, क्षेत्र सहाय्यक मोहन चौधरी, जितेंद्र सोरदे , विनोद धात्रक,अमित दंडेवार, वनरक्षक आयेशा शेख, वनरक्षक घोडवे ,वन कर्मचारी , वनमजूर व गावकरी उपस्थित होते.
Discussion about this post